omicron scare in nanded: लस नाही तर गावात प्रवेशबंदी; नांदेड जिल्ह्यातील ‘या’ गावात घेतला निर्णय – omicron scare: nanded village bans entry of unvaccinated people


हायलाइट्स:

  • लस नाही तर गावात प्रवेश नाही
  • टेंभुर्णी गावकऱ्यांनी घेतला निर्णय
  • नांदेड जिल्ह्यात घडला हा प्रकार

नांदेडः ओमिक्रॉन विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शंभर टक्के लसीकरणाची मोहीम राबविली जात असताना नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील टेंभुर्णी ग्रामपंचायतीने एक अनोखा निर्णय घेतला आहे. टेंभुर्णी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीत ग्रामसभेत ठराव घेवून लस न घेतलेल्या लोकांना गावात प्रवेश नाही, असा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं टेंभुर्णी ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.

टेंभुर्णीच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीतील ग्रामसभेत कडक भूमिका घेतली असून लसीकरण न झालेल्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्धार केला आहे. टेंभुर्णीतील मान्यवर व प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळे पहिला डोस १००%, तर दुसरा डोस लस ७५% नागरिकांनी घेतला आहे. करोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे.

वाचाः ओमिक्रॉनचा धोका; राज्यात जमावबंदी लागू, वाचा नवी नियमावली

दुसऱ्या लाटेमध्ये पहिल्या लाटेपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला. लोकांनी आपले प्रियजण गमावले आहेत. अनेक बालके अनाथ झाली आहेत. प्रत्येकाला ही भयानक परिस्थिती विसरायची आहे. करोनावर मात करण्यासाठी लवकरात लवकर लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करणे गरजेचं आहे. मात्र, लोकं लसीकरण करण्यास कचरत असल्याची परिस्थितीची आहे.

ग्रामीण भागात लसीकरणाबाबत भीती व्यक्त केली जात आहे. लोकांना करोना लसीकरण करून देण्यासाठी प्रशासन आटोकाट प्रयत्न करत आहे. नांदेड जिल्ह्यात एक प्रकरण समोर आले आहे. ज्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे. नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर तालुक्यातील टेंभुर्णी गाव आहे. या गावाची लोकसंख्या ९०० आहे. लस न घेणाऱ्या लोकांना गावात प्रवेश दिला जाणर नाही, असा निर्धार टेंभुर्णीवासीयांनी केला आहे.

वाचाः चिंतेत भर! राज्यात आणखी २० ओमिक्रॉन रुग्णांची नोंद

बाहेरगावातून जे लोक टेंभुर्णी गावात येतात त्यांना लसीकरण केल्याशिवाय गावात प्रवेश दिला जात नाही. एकतर त्यांचे प्रमाणपत्र बघितले जाते. नाहीतर त्यांनी लसीकरण केले नसेल तर तिथे जाऊन लसीकरण केले जाते. नंतरच गावात प्रवेश दिला जातो. टेंभुर्णीवासीयांची ही कल्पना पाहून परिसरातील जनता, प्रशासन टेभुर्णी ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

इतर ग्रामस्थांनीही टेंभुर्णीवासीयांच्या पावलावर पाऊल टाकले तर लवकरच आपण कोरोनाला हरवू शकू. या गावाने काही वर्षांपूर्वी शोषखड्डे या छोट्याशा ग्रामपंचायतीने संपूर्ण महाराष्ट्रासह विविध राज्यात टेंभुर्णी गावाचा नावलौकिक मिळवून दिल्याने हे गाव प्रसिद्धीच्या झोतात आले होते.नांदेड जिल्ह्यातील या टेंभुर्णी ग्रामपंचायतीने लसीकरणाच्या बाबतीत आपले नाव उज्ज्वल करून इतर सर्व गावांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.

वाचाः ओमिक्रॉनचा धोका… बूस्टर डोस द्यायचा का? केंद्राचा ‘हा’ अभ्यास ठरवणारSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *