शेतकरी नेते अतुल खुपसे-पाटील यांच्या फोटोला दुग्धाभिषेक

शेतकरी नेते अतुल खुपसे-पाटील यांच्या फोटोला दुग्धाभिषेक Milk anointing to the photo of farmer leader Atul Khupse-Patil
    कुर्डुवाडी/ राहुल धोका - भ्रष्टवादी पक्षाच्या नेत्यांचे हात हक्काच्या पाण्यासाठी चळवळीत लढणाऱ्या शेतकरी नेते अतुल खुपसे पाटील यांच्या फोटोला लागले आहेत, त्यामुळे उजनीचे पाच टीएमसी पाणी पळविणाऱ्या दत्तात्रय भरणे यांचा निषेध करत शेतकरी नेते अतुल खूपसे पाटील यांची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी माळशिरस तालुक्यामध्ये अकलूज येथे अतुल खूपसे पाटील यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करून पवित्र करण्यात आले.

   याबाबत अधिक माहिती अशी की,सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला वळवले असल्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केल्याने इंदापूर तालुक्यात जल्लोष करण्यात आला. मात्र सोलापूर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा आली असून यामध्ये शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. 

 सोलापूर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा  येणार अशी बातमी कळताच शेतकरी नेते अतुल खूपसे पाटील यांनी दत्तात्रय भरणे यांच्या पुतळ्याची अंत्ययात्रा काढून तो पुतळा उजनी जलाशयांमध्ये बुडवून निषेध व्यक्त केला होता. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी बचाव संघर्ष समितीची चळवळीची ठिणगी पेटली. 
 आज इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी नेते अतुल खूपसे पाटील यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माळशिरस तालुक्यामध्ये खुपसे पाटील यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करून प्रतिमा स्वच्छ करण्यात आली.

     यावेळी उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे सदस्य किरण भांगे,युवासेना अकलूज शहरप्रमुख शेखर खिलारे ,जनहित शेतकरी संघटनेचे केशव लोखंडे,जनसेवा संघटना तालुका कार्यकारणी सदस्य महेश शिंदे,स्वाभिमानी शेतकरी संघटना विद्यार्थी आघाडीचे शिवराम गायकवाड,प्रहार संघटनेचे अकलूज शहराध्यक्ष अविनाश सोनवणे, गोवर्धन खंडागळे,अजिंक्य पासगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: