कोरोनामुळे जीव गमवावा लागत असल्याने पत्रकारांनी काळजी घ्यावी – उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे

परत आणखी तीन पत्रकारांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला असल्याने पत्रकारांनी काळजी घ्यावी – उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आवाहन…Journalists should be careful as three more journalists lost their lives due to corona – Deputy Speaker Dr.Neelam Gorhe

      पुणे,दि.२७ - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पत्रकारांच्या मृत्यमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. काल परत जेष्ठ पत्रकार सदानंद शिंदे, अशोक सदाफळ आणि फोटोग्राफर विवेक बेंद्रे यांनी कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पत्रकाराने काळजी घेऊन पत्रकारिता करण्याचे आवाहन महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

कै.सदानंद शिंदे यांनी रत्नागिरी टाइम्स,नवकाळ, पुण्यनगरी या वृत्तपत्रातून गेली ३५ वर्ष सक्रिय काम केले. राजकीय पत्रकारितेत त्यांनी आपल्या आक्रमक लिखाणाने स्वतःचा दबदबा निर्माण केला होता. त्यांच्या विशेष लेखमाला गाजल्या होत्या. मंत्रालयात नवीन पत्रकारांना तर ते नेहमीच मोठा आधार वाटत,त्यांच्या निधनाने पत्रकार क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे ना.डॉ.गोऱ्हे यांनी श्रद्धांजली पत्रात म्हंटले आहे.

कै.अशोक सदाफळ यांनी सामना या वृत्तपत्रात गेली २० वर्ष पत्रकारितेत सक्रिय काम करत गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने झगडत होते. शिर्डीच्या ग्रामीण भागातील समस्या, शिर्डी देवस्थान चे प्रश्न, राहता तालुक्याचा सर्वांगीण विकास यासाठी कै.अशोक सदाफळ यांनी वेळोवेळी सामनाच्या माध्यमातून लिखाण केले.शिर्डी प्रेस क्लब व तालुका पत्रकार संघटना उभारणीत सिंहाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने शिर्डीमधील पत्रकरितेच्या वर्तुळात एक पोकळी निर्माण झाली आहे अशा शब्दात ना.डॉ.गोऱ्हे यांनी श्रद्धांजली व्यक्त केली.

   कै.विवेक बेंद्रे हे गेल्या २५ वर्षांपासून द हिंदू वृत्त्तपत्रासाठी छायाचित्रण करत होते.क्रिकेट हा त्यांचा आवडता विषय होता. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या बहुतेक सामन्यांसाठी ते हजर असायचे. मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात कै.विवेक बेंद्रेना ओळखणार नाही असा माणूस सापडणे कठीण असे शब्दात श्री.बेंद्रे यांना ना.डॉ.गोऱ्हे यांनी श्रद्धांजली वाहिली.

या तिन्ही कुटुंबाच्या दुःखात शिवसेना व संपुर्ण  महाराष्ट्र सहभागी आहे. हे दुःख सहन करण्याचे धैर्य व संयम मिळावा ही परमेश्वराकडे प्रार्थना ना.डॉ.गोऱ्हे यांनी केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: