लशीची मात्रा घेण्यापूर्वी रक्तदान करावे- अजित संचेती Donate blood before taking the vaccine – ajit sancheti
लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 28 दिवस रक्तदान करता येत नाही
पुणे ,दि.27/04/2021- कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा महत्वपूर्ण टप्पा 1 मे पासून सुरू होणार असून 18 वर्षांपुढील सर्वजण लस घेऊ शकणार आहेत. लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 28 दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा घेण्यापूर्वी रक्तदान करावे,असे आवाहन भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे जनसंपर्क प्रमुख अजित प्रकाश संचेती यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक रक्तदात्यांची आवश्यकता भासत आहे. त्यातच कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही 28 दिवस रक्तदान करता येत नाही त्यामुळे आधी रक्तदान करा आणि त्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षापासून रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.त्यामुळे रक्तदान करा ,रक्ताची जरुरी असणाऱ्या रुग्णांचा जीव वाचविता येईल, असे आवाहन भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे जनसंपर्क प्रमुख अजित प्रकाश संचेती यांनी केले आहे.
जे कोविड लस घेतात ते लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 28 दिवसांपर्यंत रक्त देऊ शकत नाहीत. पहिल्या डोसनंतर आता साधारण 40 दिवसांचे अंतर राखून लस दिली जात आहेे त्यामुळे हे अंंतर पहिल्या डोसनंतर 60 दिवसांनी नाहीतर दुुसरा डोसनंतर 28 दिवसांनी रक्तदान करावं लागणार आहे.याबाबत आतापर्यंत नागरिक संभ्रमावस्थेत होते.मात्र आता नॅशनल ब्लड ट्रान्सफ्यूजन कौन्सिलने (एनबी टीसी) अलीकडेच मार्गदर्शक सूचना जाहीर केली आहे की लसीचा पहिला डोस घेतल्यापासून दुसर्या डोसच्या 28 दिवसांपर्यंत कोणीही रक्तदान करू शकत नाही. त्यानंतर रक्तदान करण्यास कोणतीही अडचण येणार नाही.