भरणे मामा तुम्हाला सोलापुर जिल्ह्याचं राजस्थान वाळवंट करायचं आहे का ?

भरणे मामा तुम्हाला सोलापुर जिल्ह्याचं राजस्थान वाळवंट करायचं आहे का ? Bharane Mama Do you want to make Solapur district Rajasthan desert ?
    पंढरपूर,नागेश आदापूरे - सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी सोलापुर जिल्ह्याचे हक्काचे पाणी आपल्या स्वतःच्या इंदापुर तालुक्यासाठी वळवण्याचा घाट घातला आहे. जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारून त्याचं जिल्ह्याला पाण्यावाचून वंचित ठेवण्याचा भरणे यांचा हा डाव आहे.

   वास्तविक पाहता सोलापुर जिल्हा हा आधीच गेले कित्येक वर्ष झाले उजनीच्या पाण्यामुळे तरलेला आहे . तरी देखिल सांगोला तालुका, मंगळवेढा मधील 35 गावे,दक्षिण सोलापुर मधील 22 गावे,तसेच बार्शी करमाळा व माढा तालुक्या तील काही भाग अजुनही पाण्यावाचून वंचित आहे.

   जिल्ह्य़ातील बार्शी,एकरूख,आष्टी,दहिगाव, सिना माढा या सिंचन योजना अजुनही प्रलंबित आहेत.पोटनिवडणुकीत 35 गावाला पाणी देण्याचं गाजर दाखवण्यात आले मात्र प्रत्यक्षात तोंडचं व हक्काचं पाणी पळवण्याचं काम पालकमंत्री यांनी केलं आहे. सांडपाणी उचलणार नावाचं गोंडस नामकरण करून जिल्ह्य़ातील तमाम शेतकर्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम भरणे यांनी करत सोलापुर जिल्ह्य़ातील शेतकर्यांना मामा बनवले आहे.

  येत्या काळात पालकमंत्र्यांना जिल्ह्य़ात फिरू देणार नाही व भेटतील तिथे त्यांना मोकळ्या पाण्याच्या बाटल्या भेट देवुन जिल्ह्याची पाण्याची गरज त्यांच्या निदर्शनास आणुन देवू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजीत बागल यांनी दिला आहे . जर इंदापुरला उजनीचे पाणी वळविण्याचा हा निर्णय मागे न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्ह्य़ातील शेतकर्यांना घेवुन रस्त्यावर उतरेल व जिल्ह्य़ाच्या हक्काचे एक थेंब देखील पाणी दुसरीकडे जावु देणार नाही असेही बागल म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: