राज्यात पहिला ऑक्सिजन निर्मिती पायलट प्रोजेक्ट धाराशिव साखर कारखान्यावर उभारणार -चेअरमन अभिजीत पाटील

राज्यात पहिला ऑक्सिजन निर्मिती पायलट प्रोजेक्ट धाराशिव साखर कारखान्यावर उभारणार -चेअरमन अभिजीत पाटील first oxygen production pilot project in the state will be set up at Dharashiv Sugar Factory – Chairman Abhijeet Patil

राज्यातील साखर कारखान्यामध्ये इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निमित्तीचा पायलट प्रोजेक्ट प्रकल्प धाराशिव साखर कारखान्यावर वसंतदादा इन्स्टिट्यूट झुम मिटींगमध्ये करण्याचे निश्चित झाले.

   देशाचे नेते शरद पवार यांच्या आदेशानुसार वसंतदादा इन्स्टिट्यूटने दि.२३एप्रिल रोजी झूम मिटींगव्दारे राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांची मिटींग घेण्यात आली.त्यामध्ये धाराशिव शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील सहभागी झाले होते. 

सध्या कोविडच्या दुस-या लाटेमुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे.कोविड रूग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागली आहे.राज्यात दररोज हजारो रुग्णांना ऑक्सिजन तुटवडा फार जाणवत आहे.

   बैठकीवेळी व्हीएसआयकडून तातडीच्या उपाययोजना सांगण्यात आल्या. कारखान्यांकडे इथेनॉल प्रकल्प सुरू आहेत.अशा प्रकल्पामध्ये जुजबी फेरफार करून अतिरिक्त सामग्रीत 'माॅलेक्युलर सिव्ह' वापरून हवेतील वायुव्दारे ऑक्सिजनची निर्मीती मोठ्या प्रमाणात करण्याचा तपशील चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितला आणि या मिटींगमध्ये तत्काळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. धाराशिव साखर कारखाना प्रति दिन १६ ते २० टन ऑक्सिजन निर्मिती करणार असल्याचे चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले.

 वाढत्या ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्या साठी राज्यात प्रथमच धाराशिव साखर कारखान्याने पुढाकार घेऊन या ऑक्सिजन निर्मितीचा राज्यातील पहिला पायलट प्रकल्प कार्यरत करीत आहे.धाराशिव साखर कारखान्यास ऑक्सिजन निर्मिती तयारीस लागणा-या परवानगी ना.जयंत पाटील यांनी त्वरित देण्याचे मान्य करत  लवकर पायलट प्रकल्प कार्यरत करावा असे सांगितले. 

    वसंतदादा इन्स्टिट्यूट व मौज इंजिनिअरींग टेक्निकलच्या माध्यमातून ही प्रक्रिया करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: