सहा मिनिट वॉकिंग टेस्ट महत्वाची

सहा मिनिट वॉकिंग टेस्ट महत्वाची Six minute walking test important

   सहा मिनीटाच्या टेस्टमधून रक्तातील ऑक्सिजनची तपासणी करत आपणास आपल्या फुफ्फुसाच्या क्षमतेचा अभ्यास होतो व गरज भासल्यास आपणास डॉक्टरांचे मार्गदर्शनाने वेळेचा अपव्यय न करता पुढील उपचार करता येऊ शकतील. विशेषतः या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना वायरसचा फुफ्फुसावर परिणाम होत असल्याचे अनुभवास येत आहे. यामुळे घरच्या घरी किंवा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली "पल्स ऑक्सिमिटर" मशीनच्या सहाय्याने आपण ही तपासणी सहज करु शकतो.

  प्रथम आपणास "पल्स ऑक्सिमिटर" च्या मदतीने आपल्या रक्तातील ऑक्सिजनची लेवल पहायची व ती लिहुन घ्यायची आहे. यानंतर मध्यम गतीने किंवा संथगतीने सहा मिनीटे चालायचे आहे. सहा मिनिटे पूर्ण झाल्यानंतर एका मिनिटाने परत "पल्स ऑक्सिमिटर" मशीनच्या मदतीने आपल्या रक्तातील ऑक्सिजन लेवल लिहून घ्यायची आहे व पाच मिनिटांनी परत "पल्स ऑक्सिमिटर" मशीनच्या मदतीने रक्तातील ऑक्सिजनची लेवल तपासायची व त्याची नोंद करायची आणि सोय असल्यास रक्तदाब तपासायाचा.

  टेस्ट सुरु करण्यापूर्वी नोंद केलेली रक्तातील ऑक्सिजनची लेवल व सहा मिनिटे वॉकिंग केल्या नंतर येणारी रक्तातील ऑक्सिजनची लेवल यामध्ये जर 3 पेक्षा जास्त कमी झाले असल्यास आपणास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

  टेस्ट सुरु करण्यापुर्वी नोंद केलेली रक्तातील ऑक्सिजन ची लेवल व सहा मिनीटे वॉकिंग केल्या नंतर येणारी रक्तातील ऑक्सिजनची लेवल यामध्ये 1 ते 3 चा फरक असेल तर घाबरण्याचे काही कारण नाही. आपण सहा मिनीटे चालल्यानंतर थोडाशी धाप लागते व फरक कमी असल्याने आपली फुफ्फुसाची क्षमता चांगली असल्याचे कळते. 

   ज्या व्यक्तींचे रक्तातील ऑक्सिजनची लेवल 93,92,91 किंवा या पेक्षा कमी असते अशा व्यक्तींना डॉक्टरांचे मार्गदर्शनाने तातडीने उपचार घेणे गरजेचे आहे.

   कोरोनाचे दुसऱ्या लाटेचा विचार करता आपल्या फुप्फुसाची क्षमता वाढवणारे व्यायाम, प्राणायाम दररोज करणे आवश्यक आहे. आपण तंदुरुस्त व आपले मन शांत राहण्यासाठी योगासन मेडीटेशन केल्यास चांगला उपयोग होईल.

 विवेक परदेशी, नगरसेवक
  पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: