जागतिक हिवताप दिन

जागतिक हिवताप दिन World Malaria Day

आज सर्व जगात पुन्हा एकदा कोरोना (कोव्हीड -१९) या महामारीने थैमान घातले असून भारतामध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेमध्ये संसर्ग होणार विषाणू (व्हायरस) हा अत्यंत घातक असून यामध्ये संसर्ग झालेल्या व्यक्तीस वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येत आहेत व त्वरित निदान व उपचार न केल्यास प्रसंगी मृत्यू ओढू शकतो . या सर्व परिस्थितीत सर्व नागरिक ,प्रशासन यांनी भारत सरकार , महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यास निश्चीतच आपण या रोगापासून बचाव करू शकतो.

  सर्व साधारणपणे या आजारात पुढीलप्रमाणे लक्षणे दिसल्यास त्वरित सर्व तपासण्या कराव्यात. उदा.अंगदुखी / पाठदुखी/ पायात गोळे येणे ,सर्दी , ताप ,खोकला,घश्यात खवखव,तोंडाची चव जाणे अश्या प्रकारची लक्षणे दिसू लागल्यास त्वरित डॉक्टरांच्या सल्याने उपचार घ्यावेत . परंतु Precaution is better than cure या उक्तीस अनुसरून प्रत्येक नागरिकाने आपल्या स्वतः पासून काळजी घेण्याचे ठरविल्यास आपण सर्व समाजास व शहर व परिसरातील नागरिकांस या आजारापासून त्वरित मुक्तता मिळू शकेल . आज आपण सर्वत्र पाहिल्यास रुग्ण संख्येत वाढ झाल्याने दिसून येत आहे या आजारास / महामारीस दूर ठेवण्यासाठी आपण अत्यंत सोप्या उपाययोजना स्वत : पासून सुरु केल्यास आपल्या स्वतःची आपल्या कुटुंबाची,समाजाची,गावाची, शहराची,या राज्याची व देशाची या महामारीपासून सुटका मिळवू शकतो .

     या जागतिक हिवताप दिनाच्या निमित्ताने आपणांस विनंती करण्यात येते की ,आपण आज स्वच्छतेची व आरोग्याची शपथ घेवूत त्याप्रमाणे आपण आचरण करू ज्यामुळे आपण सर्व नागरिक सुरक्षित व आरोग्य संपन्न राहू .प्रतिज्ञा आरोग्याची प्रतिज्ञा कोव्हीड मुक्तीची .मी या देशाचा नागरिक असून मी आज प्रतिज्ञा करतो की, मी स्वत: निरोगी राहण्यासाठी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेईन.मी लवकर झोपेन व लवकर उठेन ,दररोज किमान १/२ तास श्वसनाचे व्यायाम करीन. माझ्या माहितीत असलेल्या आजाराबाबत जागरूक राहीन .वेळोवेळी प्रतिबंधात्मक औषधे घेईन .मी योग्य प्रमाणात पाणी पेईन .जेवण घेईन ,झोप घेईन. मी सतत मास्कचा वापर करेन , वारंवार साबण व पाण्याने हात धुवेन. मी सामाजिक अंतर (दोन व्यक्तीमध्ये २ मीटर ) ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याच प्रवास करेन , मी घरात विलगीकरण असल्यास त्याचे सर्व नियम पाळेन ,माझ्या संपर्कात आलेल्या सर्वाची माहिती मी यंत्रणेस देईन .माझ्यामुळे इतरांना लागण होणार नाही याबाबत मी दक्ष राहीन.मला संसर्ग झाल्याचे दिसून आल्यास त्वरित निदान व उपचार घेईन .या आजारापासून मुक्ते साठी सर्वांना जागृत करेन . मी माझी गल्ली ,गाव , शहर कोरोनामुक्त ठेवण्याची जबाबदारी घेत आहे . जय हिंद.

तरी वरीलप्रमाणे आवश्यक बाबींचा काटेकोरपणे अवलंब केल्यास आपले गाव,शहर,जिल्हा कोव्हीड मुक्त होईल . आज जागतिक हिवताप दिनाचे निमित्ताने आपण सर्व मिळून कोरोना आजारास हद्दपार करूयात, निरोगी आयुष्य जगुयात. सर्व नागरिकांनी स्वत:पासून सुरुवात केल्यास आपण वेळ,पैसा व आरोग्य यांचे रक्षण करूयात ,असे आवाहन सर्व प्रशासकीय यंत्रणे मार्फत सर्व नागरिकांना करण्यात येत आहे .

  माझे आरोग्य,माझी जबाबदारी पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर नागरी हिवताप योजना जागतिक हिवताप दिन दरवर्षी दि.२५ एप्रिल हा दिवस " जागतिक हिवताप दिन " म्हणून साजरा करण्यात येतो,परंतु मागील वर्षापासून कोव्हीड१९ महामारीमुळे प्रभात फेरी ,गट संमलेन,कार्यशाळा इत्यादी कार्यक्रमावर बंधने आल्याने या वर्षी सुद्धा जागतिक हिवताप दिन हा व्हर्चुअल पध्दतीने साजरा करण्यात येत आहे . त्या अनुषंगाने हिवताप शून्यावर आणण्यासाठी फेसबुक ,व्हॉटस अँप , youtube channel तसेच इतर सोशल मिडिया,वृतपत्रे,दूरदर्शन इत्यादी माध्यमातून साजरा करण्यात येत आहे . कोव्हीड -१९ च्या प्रादुर्भावसोबतच हिवताप नियंत्रणासाठी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे .त्यासाठी हिवताप आजाराशी संबधित त्रीसुत्रीचा वापर असणे आवश्यक आहे . यामध्ये हिवतापाचा प्रसारक अँनाफिलीस मादी डास नागरिकांचे आरोग्य व डासोत्पत्ती ठिकाणा वर नियंत्रण या आवश्यक गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्यास हिवताप भारतातून , महाराष्ट्रातून तसेच आपल्या जिल्ह्यातून व शहरातून हद्दपार करणे शक्य आहे .हिवतापाचा प्रसार अँनोफिलीस डासाच्या मादीमार्फत होत असून या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होत असते. जसे कॅनाल मध्ये साठलेले पाणी,पावसाळ्यानंतर साठलेली डबकी,घराभोवातालचा परिसर स्वच्छ ठेवावा , कोठेही पाणी साठू देऊ नये.सदर डबकी वाहती करावीत,अथवा त्यामध्ये अळीनाशक वा जळके तेल टाकून डासोत्पत्ती स्थाने नष्ट करावीत.या अँनाफिलीस डासाच्या मादीमध्ये हिवतापाचे परजीवी जंतू त्याच्या सोंडेमार्फत माणसाच्या शरीरात सोडले जातात हे परजीवी मनुष्याच्या यकृतामध्ये वाढ होऊन रक्तात प्रवेश करतात यामुळे मानवास थंडी ,ताप,डोके दुखी,मळमळ इत्यादी लक्षणे दिसू लागतात ताप आल्यानंतर मोठ्या प्रमाणात घाम येतो. माणसाच्या शरीरात परजीवीचा प्रवेश झाल्यानंतर ७-८ दिवसात लक्षणे दिसू लागतात.तरी लक्षणे आढळून आल्यास त्वरित रक्त नमुना तपासणी करणे आवश्यक आहे. तपासणीअंती जंतू दिसून आल्यास समूळ उपचार घ्यावा.हिवतापाचे जंतू चार प्रकारचे असून परजीवी जंतूच्यानुसार समूळ औषधोपचार देण्यात येतो. यामध्ये प्रामुख्याने

१ ) प्लाजमोडीयम व्हायवेक्स २ ) प्लाजमोडीयम फेल्सीपेरम ३ ) प्लाजमोडीयम मलेरिया ४ ) प्लाजमोडीयम ओव्हेल या चार प्रकारच्या जंतूचा समावेश होतो .

आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने प्लाजमोडीयम व्हायवेक्स व प्लाजमोडीयम फेल्सीपेरेम या दोन जातीच प्रामुख्याने आढळून येतात .

भारताच्या पूर्वेकडील राज्यात तसेच अतिवृष्टीच्या भागात मलेरिया व ओव्हेल या प्रजाती आढळून येतात पण याचे प्रमाण अत्यल्प आहे.समूळ उपचारामध्ये प्लाजमोडीयम व्हायवेक्स जंतूसाठी १४ दिवसांचा उपचार करण्यात येतो यामध्ये प्रथम तीन दिवसासाठी क्लोरोक्विन 1500 mg ( 600 + 600 + 300 ) याप्रमाणे डोस असून १४ वर्षा पुढील रुग्णास १ ते १४ दिवसापर्यंत 45 mg प्रायमाक्वीन गोळ्या देण्यात येतात.प्लाजमोडीयम फेल्सीपेरम संसर्ग असल्यास ३ दिवसांचा समूळ उपचार देण्यात येतो, यामध्ये Artisunet combination थेरपी असून ३ औषधे देण्यात येतात यामध्ये Artisunet a sulphadoxin या मात्रा एकत्रित असतात त्यामुळे याला Artisunet combination Therapy असे संबोधण्यात येते .

या प्रकारात प्रथम दिनी Artisunet 50mg+ sp 500 mg दुसऱ्या दिवशी Artisunet + pramaquine व तिसऱ्या दिवशी Artisunet 50mg या प्रकारचा समूळ उपचार १४ वर्षावरील रुग्णास देण्यात येतो . गर्भवती स्त्रिया व १ वर्षाच्या आतील बालकास समूळ उपचार देता येत नाही. गर्भवती प्रसूत झाल्यानंतर ६ आठवड्यानंतर व लहान बाळास वर्षा नंतर समूळ उपचार देण्यात येतो.यामध्ये Chloroquene हे गृहीतोउचारा साठी दिले जाते तर रुग्ण दुषित आढळून आल्यास primaquene हे औषध समूळ उपचारासाठी देण्यात येते .

 क्लोरोक्वीन हे हिवतापासाठी रामबाण औषध असून लक्षणानंतर त्वरित घेतल्यास रुग्ण हिवतापाच्या लक्षणापासून मुक्त होतो परंतु त्याच्या शरीरात जंतू असल्याने जंतूमुळे समाजास प्रसारा पासून रोखण्यासाठी समूळ उपचार देणे अत्यंत आवश्यक आहे.त्यामुळेच म्हटले जाते की , " क्लोरोक्विनची गोळी करी हिवतापाची होळी " किटकजन्य आजार प्रतिबंधासाठी " त्वरित निदान व समूळ उपचार " या पद्धतीचा अवलंब केल्यास कोणत्याही किटकजन्य आजाराचा तसेच साथ रोगाचा प्रसार थांबविता येईल . 

 किटकजन्य आजार जसे हिवताप,चिकनगुन्या, डेंग्यू ,जे.ई. हे आजार डासांमार्फत पसरतात तरी डासांवर नियंत्रण ठेवल्याने किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून सुरुवात केल्यास डासमुक्त वार्ड ,गाव,शहर ,जिल्हा,राज्य व देश होणार आहे.

  डासांवर नियंत्रणासाठी डासोत्पती स्थाने नष्ट करणे,साठवणीच्या पाण्यात गप्पी माश्यांचा जास्तीत जास्त वापर करणे, डास प्रतिबंधात्मक उपाय योजना जीवशास्त्रीय पद्धतीने राबविल्यास डासांवरनियंत्रण व पर्यावरण संरक्षण याबाबी प्रामुख्याने आपले उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार आहे . 

१) ” माझ्या पासून सुरुवात करू हिवताप झिरो करू “
२ ) ” डंख छोटा धोका मोठा “
३ ) ” येता कणकण तापाची,करा तपासणी रक्ताची “. तरी या जागतिक हिवताप दिनाच्या निमित्ताने आपण सर्व मिळून निर्धार करूयात की , माझे घराचा परिसर ,गल्ली ,बोळ ,उपनगर व सर्व शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करीन , पाणीसाठा तयार होऊन डासोत्पती होणार नाही याची खबरदारी घेऊन हिवतापाचे लक्षणे दिसल्यास त्वरित निदान व उपचार घेईन अशी प्रतिज्ञा करूयात . तसेच या कोव्हीड -१ ९ महामारीच्या काळात SMS चा जास्तीत जास्त वापर करावा . सॅनिटायझर , मास्क व शोषल डिस्टन्सींग हे नियम पाळून आपण आपली व आपल्या कुटुंबाची व सर्व समाजाची काळजी घेऊ यात . या साथरोगाच्या काळात सर्वानी शासनाचे पालन नियमांचे पालन केल्यास व त्वरित लसीकरण घेतल्यास आपण लवकरच या कोव्हीड -१ ९ च्या रोगापासून सुरुक्षित राहू . तर चल या जागतिक हिवताप दिनाच्या निमित्ताने आपण निर्धार करुयात शासनाचे नियमांचे पालन करून सर्व आजारांपासून सुरुक्षित राहूयात असे आवाहन जीवशास्त्रज्ञ किरण मंजुळ, नागरी हिवताप योजना नगरपरिषद ,पंढरपूर जिल्हा हिवताप अधिकारी जिल्हा हिवताप कार्यालय ,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पंढरपूर नगरपरिषद ,पंढरपूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: