माझ्या अनुभवावर आधारित मौन एक साधना


माझ्या अनुभवावर आधारित मौन एक साधना :

मौन म्हणजे फक्त मौन असते
कोणाचेही असो सर्वांचे सारखेच असते !!१!!

मौन हीअंतरप्रेरणेची स्वीकृती असते
मौन ही मेंदूच्या निश्चयाची स्वीकृती असते !!२!!

मौन ही प्रबळ मनाची साधना असते
मौन ही व्यक्तित्वाच्या प्रतिभेची जननी असते !!३!!

मौन ही विकार विकृतीची पानगळ असते
मौन ही उच्चत्तम संस्कृतीची मशागत असते !४!!

मुखान न बोलणं हे बाह्यमौन असते !
मनाशी अबोल राहणं हे अंतरमौन असते !!५!!

मौन ही चारित्र्याची शुद्धता असते
मौन हीच बुद्धीच्या प्रगल्भतेची ऊर्जा असते !!६!!

आनंद कोठडीया,जेऊर
९४०४६९२२००

सुप्रभात
” एखाद्याचा अवमान ,अपमान वा टिंगल टवाळी करण सोपं असतं पण त्यांचेतील सद्गुण ,मोठेपण अवलोकन करून मोठं होणं अवघड असतं “!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: