डॉ अशोक वागळे यांचे निधन Dr.Ashok Wagle passed away
कुर्डूवाडीचा वैद्यकीय क्षेत्रातील देवदूत हरपला
कुर्डूवाडी / राहुल धोका – कुर्डूवाडी सारख्या ग्रामीण भागात अद्ययावत रुग्णालय उभा करून हजारो रुग्ण बरे करणारे देवदूत डॉ.अशोक विनायक वागळे (वय ८५) यांच्या निधनाची बातमी सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरली आणि सर्वत्र शोककळा पसरली.
कुर्डूवाडीसारख्या ग्रामीण भागात तब्बल ४० वर्ष निस्पृहपणे वैधकीय सेवा देणारे डॉ वागळे यांचा जन्म ७ ऑगस्ट १९३६ साली झाला.जनरल सर्जन असतानाही त्यांनी कर्मभूमी म्हणून कुर्डूवाडीची निवड केली.त्याकाळच्या दुष्काळी आणि मागास भागात ते आले.भले लट्ठ पगाराची नोकरी सोडून आपल्या मामाच्या शब्दाखातर ते कुर्डुवाडीत आले.कुर्डूवाडी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून कुर्डुवाडी येथे रुग्ण येत. अद्ययावत यंत्रणा नसतानाही त्यांच्या चिकित्सा शास्त्रामुळे रुग्ण बरे होत.केवळ आठ आणे एवढी फी ते प्रथम घेत. पैश्याच्या मागे न धावता रुग्णसेवेत रमलेला एक देवदूत हरपला आहे.वयोमानामुळे ते पुणे येथे स्थायिक झाले होते.मात्र तेथेही कुर्डूवाडीचे रुग्ण विश्वासाने जात.कुर्डुवाडीतील रुग्ण सेवेचा आदर्श काळाआड गेला याची सर्वत्र खंत व्यक्त होत. आहे.