80 कोटी गरिबांना मोफत अन्नधान्य देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय स्वागतार्ह

हातावर पोट असणाऱ्या गरिबांची काळजी वाहणारे मोदी सरकार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.23 – प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून देशभरातील 80 कोटी गरिबांना येत्या मे आणि जून महिन्यात प्रत्येकी 5 किलो अन्नधान्य मोफत देण्याचा स्वागतार्ह निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. हातावर पोट असणाऱ्या गरिबांची काळजी वाहणारे मोदी सरकार असल्याची प्रचिती देणारा हा निर्णय असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

देशात कोरोनाचा प्रसार वाढत आहे.महाराष्ट्रात तर मोठया प्रमाणात कोरोनाचा कहर वाढला आहे. महाराष्ट्राप्रमाणे अन्य राज्यात कडक निर्बंध लागले आहेत. लॉकडाऊन लावण्यात आला आहे.त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गरिबांना मोलमजुरी मिळत नाही. रोजगार बुडाला आहे.त्यामुळे गरिबांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न आहे.गरिबांचे हे दुःख नेमके ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीब कल्याण अन्नयोजनेद्वारे देशभरातील 80 कोटी गरिबांना मे आणि जून महिन्यात प्रत्येकी 5 किलो अन्नधान्य मोफत देण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आणि गरिबांप्रति त्यांची कटीबद्धता  दाखविणारा निर्णय आहे अशा शब्दांत ना.रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

80 कोटी गरिबांना मोफत अन्नधान्य देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय स्वागतार्ह Prime Minister Narendra Modis decision to provide free foodgrains to 80 crore poor people is welcome

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: