कामदा एकादशी निमीत्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास द्राक्षांची आकर्षक आरास

कामदा एकादशीनिमीत्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास द्राक्षांची आकर्षक आरास Attractive decoration of grapes on the occasion of Kamada Ekadashi to Mother Vitthal Rukmini

पंढरपूर,जि.सोलापूर – दि.२३/०४/२०२१ रोजी चैत्र शुध्द॥११ कामदा एकादशी निमीत्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास तसेच श्री विठ्ठल चौखांबी येथे द्राक्षांची आकर्षक आरास करण्यात आली होती.त्यामुळे श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह श्री विठ्ठल चौखांबीस मनमोहक स्वरूप प्राप्त झाले होते.

चैत्र शुध्द॥११कामदा एकादशी निमीत्त द्राक्षांची आरास भाविक संजय टिकोरे,रा.लक्ष्मी टाकळी, ता.पंढरपूर यांच्यावतीने  करण्यात आली होती. द्राक्ष आणि द्राक्षांची पाने वापरून ही आरास करण्यात आली होती.आरास करण्यासाठी ७०० किलो द्राक्ष वापरण्यात आली होती. द्राक्षांची सुंदर आरास श्री विठ्ठल रूक्मिणी कर्मचारी वृंद व शिंदे ब्रदर्स साई डेकोरेटर्स पंढरपूर यांनी केली होती अशी माहिती विठ्ठल जोशी,कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती,पंढरपूर यांनी दिली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: