राज्यभरात रुग्णालयातील ऑक्सिजन साठवणूक टाक्यांचे ऑडिट करावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या दि.23 एप्रिल रोजी नाशिकच्या डॉ.झाकीर हुसैन रूग्णालयाला भेट देणार
  मुंबई दि.22/04/2024 - नाशिकच्या झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन टँक गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेत व्हेंटिलेटरवर असणाऱ्या 24 रुग्णांचा मृत्यू झाला.अत्यंत दुःखद धक्कादायक घटना घडली आहे.या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी.ऑक्सिजन पुरवठ्याअभावी असे मृत्यूचे थैमान राज्यात इतर कुठेही पुन्हा घडू नये याची खबरदारी राज्य सरकारने घ्यावी.त्यासाठी राज्यभरातील रुग्णालयांमधील ऑक्सिजन साठवणूक टाक्यांची  तपासणी करावी, ऑडिट करावे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. 

  नाशिकच्या डॉ.झाकीर हुसैन रुग्णायलयाला ना.रामदास आठवले उद्या दि.23 एप्रिलला भेट देऊन पाहणी करणार आहेत.या दुर्घनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने सांत्वनपर 10 लाख रुपये निधी द्यावा अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने व्हेंटिलेटरवर असलेले 24 रुग्ण तात्काळ मृत्युमुखी पडले ही नाशिकची घटना मन विदीर्ण करणारी आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ना.रामदास आठवले यांनी वाहिली आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करून निष्कळजीपणाबद्दल दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.राज्यातील सर्व  रुग्णायलयात असणाऱ्या ऑक्सिजन टॅंकची  देखभाल पाहणी करून ऑक्सिजन पुरवठयात खंड पडणार नाही याची खबरदारी घ्यावी. ऑक्सिजन टॅंक दुरुस्तीकडे लक्ष द्यावे. टँक लिकेजमुळे इतकी भीषण घटना घडली या घटने वरून संपूर्ण राज्यात चिंतेचे वातावरण असून पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी राज्य सरकारने खबरदारी घ्यावी असे मत ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे .

राज्यभरात रुग्णालयातील ऑक्सिजन साठवणूक टाक्यांचे ऑडिट करावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले Oxygen storage tanks in hospitals across the state should be audited – Union Minister of State Ramdas Athawale

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: