श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीतर्फे श्री रामनवमी उत्सव

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीतर्फे श्री रामनवमी उत्सव Shri Ram Navami celebration by Shri Vitthal Rukmini Mandir Samiti

पंढरपूर,21/04/2021- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती , पंढरपूरच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे रूढी व परंपरे नुसार मंदिरातील सण / उत्सव साजरे करणेत येतात.त्यानुसार आज चैत्र शुध्द।।०९ बुधवार दि. २१/०४/२०२१ रोजी मंदिर समितीतर्फे श्री रामनवमी उत्सव मोजक्याच कर्मचाऱ्यांमध्ये साजरा करण्यात आला . त्यानिमित्त श्रींच्या महानैवेद्यानंतर श्रीं ना पोशाख करण्यात आला त्यामध्ये पांढरी अंगी,पांढरे धोतर,पांढरे उपरणे , पांढरे पागोटे परिधान करण्यात आले व दुपारी १२ वाजता पांडुरंगास हार,तुळशी,फुले,तुरा अर्पण करून पेढे,बर्फी ,सुंठवडा दाखवुन पांडुरंगाच्या अंगावरती गुलाल उधळण्यात आला.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड पुजा करताना (छाया-सतीश चव्हाण)

तसेच विठ्ठल सभामंडपामध्ये सकाळी १० ते १२ रामजन्माचे कीर्तन मंदिर कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आले व पाळण्यात कुंची घालून ठेवलेला नारळ सुवासिनींना प्रसाद म्हणून कीर्तनानंतर देण्यात आला व सुंठवडा वाटण्यात आला . सदरच्या श्री रामनवमीच्या कार्यक्रमावेळी कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर सॅनिटाईजर व मास्क इत्यादीचा वापर करणेत येवून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती अशी माहिती श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती,पंढरपूरच्यावतीने कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: