घरातील माणसं डोळ्यासमोर तडफडुन मरताना बघण्याची वाईट वेळ या कारखानदारांमुळे आमच्यावर

  • घरातील माणसं डोळ्यासमोर तडफडुन मरताना बघण्याची वाईट वेळ या कारखानदारांमुळे आमच्यावर we have a bad time watching people of the house die in front of our eyes

पंढरपूर – पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत मुंबई पुण्यातुन प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी कोरोना गावागावामध्ये प्रसाद वाटल्यासारखे वाटला.आज शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे पेशंट घराघरात आहेत.

  अशा परिस्थितीत रोख पैसे दवाखान्यात जमा केल्याशिवाय बेड शिल्लक असताना डॉक्टर पेशंट घेत नाहीत. शेतकर्‍यांना गेलेल्या उसाची बिलं अजून मिळालेली नाहीत. नुकत्याच झालेल्या या पोटनिवडणुकीत कारखानदारांनी निवडणूक लढवली त्यामध्ये कोट्यावधी रुपयांची उधळण केली पण शेतकर्‍यांची बिल कामगारांना पगार आणि तोडणी वाहतुकीचे पैसे देण्यासाठी या साखरसम्राटांकडे पैसे नाहीत.

    एकंदरीत शेतकर्‍यांचा खिसा रिकामा असल्यामुळे कष्टकरी,दुकानदार,व्यापारी,हातावर पोट असणार्‍या लोकांनाही पैसे मिळत नाहीत, कारखान्यांनी बिलं दिली नाहीत, त्यामुळे दोन्ही तालुक्यातील लोकांची अर्थिक कोंडी झाली असून कष्टाचे लाखो रुपये कारखान्यांनी न दिल्यामुळे घरातील कोरोना पेशंटच्या उपचारासाठी पैसे नाहीत. या कारणांमुळे घरातील माणसं डोळ्या समोर तडफडुन मरताना बघण्याची वाईट वेळ या कारखानदारांमुळे आमच्यावर येत आहे,त्यामुळे आता शेतकरी आपल्या ऊसाचे बिल ज्या चेअरमननी दिले नाहीत त्यांच्या घरी पेशंट घेऊन जातील, एखादा पेशंट दगावला तर त्याचा मृतदेह  घेऊन यांच्या दारात बसणार आहेत,स्वतःच्या निवडणुकीत उधळायला पैसे कुठून येतात मग आमची ऊसाची बिले,कामगाराचे पगार आणि तोडणी वाहतुकीचे पैसे द्यायला का नाहीत ? त्यामुळे आता अंत न पाहता हे पैसे त्वरीत अदा करण्यात यावेत असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन शिंदे पाटील यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: