या सर्व लिंक्स मोबाईल हॅकरच्या फसव्या असून त्यावर कोणीही क्लिक करू नये

या सर्व लिंक्स मोबाईल हॅकरच्या फसव्या असून त्यावर कोणीही क्लिक करू नये All these links are fraudulent for mobile hackers and no one should click on them

मागील काही दिवसांपासून मोबाईलवर वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मोबाईल हॅकरच्या तीन फसव्या लिंक्स फिरत आहेत . त्यावर कोणीही क्लिक करू नये अथवा त्या दुसऱ्यांना पुढे पाठवू नये ,असे आवाहन सायबर पोलीसांनी केले आहे .मागील दोन दिवसापासून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील विविध व्हॉट्सअप ग्रुपवर तीन फसवे लिंक्स व्हायरल होताना दिसत आहेत. यातील पहिल्या दोन लिंक्स या दोन महिन्याच्या मोफत मेंबरशिपच्या असल्याचे तर तिसरी उत्तम दर्जाच्या व्हिडीओ पाहण्याच्या अँप असल्याचे भासविले आहे.

या सर्व लिंक्स मोबाईल हॅकरच्या फसव्या असून त्यावर कोणीही क्लिक करू नये अथवा दुसऱ्यांना ग्रुपवर पुढे पाठवू नये . जर कोणी या लिंक्सवर क्लिक केल्यास आपल्या मोबाईलवरील गोपनीय माहिती उदा .आपली बँक खाते,डेबिट क्रेडीट कार्ड अथवा अन्य महत्वाची माहिती हॅकरच्या हाती लागून आपली ऑनलाइन आर्थिक फसवणूक होऊ शकते.आपली ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी अशा मोहात टाकणाऱ्या कोणत्याही लिंक्सची खातरजमा केल्याशिवाय नागरिकांनी कोणत्याही लिंक्सवर क्लिक करू नये , असे आवाहन सायबर पोलीसांनी केले आहे .

     सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे .त्या पार्श्व भूमीवर पोलीस यंत्रणेकडून मोबाईलधारकांना आवाहन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: