Video : ‘१० रुपये की पेप्सी, अय्यर भाई सेक्सी..’; कानपुरीवासियांचा व्हिडिओ तुफान व्हायरल


INDvsNZ : कानपूर : ऐतिहासिक कानपूर शहर तेथील लोकांच्या अनोख्या अंदाजासाठी ओळखले जाते. स्टँडमध्ये बसून सामना पाहणाऱ्या त्या तरुणाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर कानपूरवासियांचा आणखी एक व्हिडिओ सध्या व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओमध्ये सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आलेले तरुण श्रेयस अय्यरचा जयजयकार करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे.

वाचा- श्रेयसने निराश केले नाही; पदार्पणाच्या कसोटीत शतकासह केला विक्रम

१० रुपये की पेप्सी, अय्यर भाई सेक्सी
श्रेयर अय्यरने पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावले. त्यामुळेच भारताने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ३४५ धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने पाच विकेट घेतल्या. अय्यरने १७१ चेंडूत १०५ धावा केल्या. पहिल्या कसोटीत शतक झळकावणारा तो भारताचा १६ वा क्रिकेटपटू ठरला आहे. या यादीत लाला अमरनाथ, गुंडप्पा विश्वनाथ, सौरव गांगुली, रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांची नावे आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये चाहत्यांचा एक गट ‘१० रुपयांची पेप्सी, अय्यर भाई सेक्सी’ असा नारा देत आहेत.

वाचा- धक्कादायक, केन विलियमसन असा कसा वागला; अंपायर्सनी मॅच थांबवली आणि…

श्रेयस अय्यरच्या शतकानंतर ट्विटरवर अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. माजी अनुभवी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने श्रेयसच्या खेळीचे कौतुक केले. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “दबावाखाली खेळली एक शानदार खेळी. श्रेयस अय्यरने उत्तम परिपक्वता दाखवली आणि कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा तो १६वा भारतीय खेळाडू ठरला.”

वाचा- श्रेयस अय्यरने ते स्वप्न पूर्ण केले; ४ वर्ष झाली वडिलांनी Whatsappचा डीपी बदलला नाही

माजी खेळाडू मोहम्मद कैफनेही अय्यरच्या शतकाचे कौतुक केले. त्याने लिहिले की, “दुखापतीनंतर इतक्या चांगल्या पद्धतीने टॉप लेव्हल क्रिकेटमध्ये परतणे सोपे नाही. तुम्ही श्रेयस अय्यर असाल, तरच हे शक्य होईल.” प्रज्ञान ओझानेही श्रेयसच्या दुखापतीचे उदाहरण देत त्याच्या खेळीचे कौतुक केले. श्रेयस अय्यरच्या शतकावर वसीम जाफरने अनोख्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: