कमिन्स बनला ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार; स्टीव्ह स्मिथला दिली ही खास जबाबदारी


मेलबर्न : टीम पेनने कसोटी संघाचा राजीनामा दिल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया नव्या कर्णधाराच्या शोधात होती. अखेर पॅट कमिन्सच्या रुपाने त्यांचा शोध पूर्ण झाला आहे. कमिन्सकडे ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा नवा कर्णधार म्हणून, तर स्टीव्ह स्मिथकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रिची बेनॉडनंतर पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा पूर्णवेळ कर्णधार असणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे.

वाचा- धक्कादायक, केन विलियमसन असा कसा वागला; अंपायर्सनी मॅच थांबवली आणि…

पॅट कमिन्स हा गेल्या दोन वर्षांपासून ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा उपकर्णधार होता आणि आता त्याला टीम पेनच्या जागी कर्णधार बनवण्यात आले आहे. कर्णधारपद मिळाल्यावर तो म्हणाला, ‘मला कर्णधारपद मिळाल्याने मी आनंदी आहे. आमच्यापुढे महत्त्वाची अॅशेस मालिका आहे. ज्या प्रकारे टीम पेनने संघाचे नेतृत्व केले, त्याचप्रकारे मी संघाचे नेतृत्व करू शकेन अशी आशा आहे. माझ्याकडे आणि स्टीव्हकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. संघात इतरही अनेक ज्येष्ठ आणि युवा खेळाडू आहेत.’

वाचा- श्रेयस अय्यरने ते स्वप्न पूर्ण केले; ४ वर्ष झाली वडिलांनी Whatsappचा डीपी बदलला नाही

पाच सदस्यीय मंडळाने पॅट कमिन्स आणि स्टीव्ह स्मिथ यांची मुलाखत घेतली. मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांचा यात सहभाग नव्हता. स्टीव्ह स्मिथ पुन्हा एकदा नेतृत्वाच्या भूमिकेत परतत आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती, पण आता पुन्हा एकदा तो ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा उपकर्णधार बनणार आहे.

वाचा- श्रेयसने निराश केले नाही; पदार्पणाच्या कसोटीत शतकासह केला विक्रम

पॅट कमिन्सला नाही कर्णधारपदाचा अनुभव
पॅट कमिन्सला कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा फारसा अनुभव नाही. याआधी त्याने फक्त देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यू साउथ वेल्सचे कर्णधारपद भूषवले होते. तसेच त्याने आपल्या नेतृत्वाखाली संघाला मार्श कपच्या अंतिम फेरीत पोहोचवले होते.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: