मुंबईत परतताच परमबीर सिंह यांची कोर्टात धाव; केली ‘ही’ विनंती


हायलाइट्स:

  • परमबीर सिंह मुंबईत दाखल
  • तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू
  • परमबीर सिंह यांची कोर्टात धाव

मुंबईः मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) हे अखेर सहा महिन्यांनंतर मुंबईत दाखल झाले आहेत. परमबीर सिंह मुंबईत येताच त्यांच्यासमोर चौकशीचा ससेमिरा मागे लागला आहे. गुन्हे शाखेने परमबीर सिंग यांची सात तास चौकशी केली. तसंच, आज ठाणे नगर पोलिस ठाण्यात ते चौकशीसाठी हजर झाले आहेत. दरम्यान, एकीकडे परमबीर सिंह यांच्या चौकशीला वेग आला असताना त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे.

गेल्याच आठवड्यात परमबीर सिंह यांना न्यायालयाने फरार घोषित केलं होतं. तसंच, गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीच्या आधारे त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही काढण्यात आलं आहे. त्यामुळं मुंबईत परतल्यानंतर परमबीर सिंह यांनी कोर्टात धाव घेतली असून आपल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची मागणी केली आहे. तसंच, फरार घोषित केलेले निर्णयही मागे घेण्याची विनंती केली आहे.

वाचाः जे वकील त्यांना भडकवत आहेत ते…; एसटी संपाबाबत संजय राऊत स्पष्टच बोलले

परमबीर यांची सात तास चौकशी

परमबीर सिंह गुरुवारी सकाळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कांदिवली येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी परमबीर यांची तब्बल सात तास कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान परमबीर यांनी आपल्यावरील खंडणीचे आरोप फेटाळले असून या गुन्ह्यात अटक केलेल्या इतर आरोपींना ओळखत नसल्याचे म्हटले आहे.

वाचाः चंद्रकांत पाटील यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीत; राजकीय चर्चांना उधाण

चौकशीला पुन्हा बोलावणार?

पोलिसांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना परमबीर यांनी उत्तरे दिली असली तरी ही उत्तरे असमाधानकारक असल्याने त्यांना गुन्हे शाखा गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलावणार असल्याचे सांगण्यात आले. सचिन वाझे आणि तक्रारदार विमल अग्रवाल यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्याच्याशी माझा काहीच संबंध नसल्याचे परमबीर यांनी चौकशीदरम्यान सांगितले. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

वाचाः
नाशिक जिल्हा हादरला!भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, चार दिवसांतील तिसरी घटनाSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: