narayan rane : महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? शरद पवार दिल्लीला रवाना; राणे म्हणाले, ‘महाराष्ट्रात मार्चपर्यंत भाजपचे सरकार येणार’


जयपूरः महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. येत्या मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होईल. आता सर्व काही ठीक होईल, असे नारायण राणे म्हणाले. राणे यांनी जयपूरमध्ये म्हटलं आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवर आपले सर्व कार्यक्रम रद्द करून आज दुपारी दिल्लीत पोहोचत आहेत. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे सोबतच मुंबईहून दिल्लीला रवाना झाले आहेत. दुसरीकडे, भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही आज सकाळीच दिल्लीत पोहोचले आहेत.

महाराष्ट्र भाजपचे अनेक नेतेही कालपासूनच दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कालच भेट घेतली. त्या बैठकीला देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार होते. मात्र, ते उशिरा दिल्लीत पोहोचले. सध्या भाजप मुख्यालयात चंद्रकांतदादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस संघटनमंत्री बी. एल. संतोष यांची भेट घेत आहेत.
Constitution Day: देशहितावर राजकारण वरचढ ठरतंय, पंतप्रधानांनी व्यक्त केली खंत

या वृत्ताशी संबंधित सूत्रांकडून आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय नेत्याची महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली, असं बोललं जातंय.

शेतकरी आंदोलनाची वर्षपूर्ती : दिल्लीच्या सीमांवर गर्दी, पोलिसांचं आवाहनSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: