कच्च्या तेलाच्या भावात घसरण ; जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव


हायलाइट्स:

  • इंधनावरील शुल्क कपात केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे.
  • आज शुक्रवारी इंधन दरात कोणताही बदल झाला नाही.
  • सलग २२ व्या दिवशी देशात पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर आहेत.

मुंबई : दिवाळीत केंद्र सरकारने इंधनावरील शुल्क कपात केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. आज शुक्रवारी इंधन दरात कोणताही बदल झाला नाही. सलग २२ व्या दिवशी देशात पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर आहेत.

‘पेटीएम’चा यू-टर्न अन् गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात! तीन सत्रात शेअरने केली २९ टक्क्यांची भरपाई
आज शुक्रवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल १०३.९७ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९४.१४ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपये इतके आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये असून कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये आहे.

शेअर बाजार तेजीत; सेन्सेक्सची ५०० अंकांची झेप, गुंतवणूकदार ५० हजार कोटींनी मालामाल
कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आज शुक्रवारी तेलाचा भाव १ टक्क्याने घसरला. सलग तिसऱ्या सत्रात कच्चे तेल स्वस्त झाले. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.३५ टक्क्याने घसरला आणि तो ७६.०४ डॉलर प्रती बॅरल झाला. ब्रेंट क्रूडचा भाव १.२ टक्क्याने कमी होऊन ८१.२६ डॉलर प्रती बॅरल झाला.

सलग दुसऱ्या दिवशी सोने महागले ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव
इंधन महागाईला रोखण्यासाठी अमेरिकेने तेलाचा राखीव साठा वापरण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ भारताने देखील राखीव साठा वापरण्याची घोषणा केली आहे. यामुळे बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा वाढला आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या सत्रात तेलाच्या किमतीत घसरण झाली.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: