श्रेयसने निराश केले नाही; पदार्पणाच्या कसोटीत शतकासह केला विक्रम


कानपूर: न्यूझीलंडविरुद्ध कानपूर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय चाहत्यांना आनंदाची बातमी मिळाली. भारताचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या कसोटीत शतक (Shreyas Iyer debut century) झळकावण्याची कामगिरी केली. वनडे आणि टी-२० मध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या श्रेयसने कसोटीत देखील तो संघाच्या मधळ्या फळीचा मोठा आधार ठरू शकतो हे पहिल्याच सामन्यात सिद्ध केले.

वाचा- अजिंक्य रहाणेच्या ‘त्या’ एका निर्णयामुळे श्रेयसचे पदार्पण लांबले; ४ वर्षापूर्वी खेळला असता कसोटी

वनडे आणि टी-२० संघात स्थान मिळाल्यानंतर श्रेयसला कसोटी संघात स्थान मिळण्यासाठी तब्बल चार वर्ष वाट पाहावी लागली. जेव्हा संधी मिळाली तेव्हा श्रेयसने ती सोडली नाही. कानपूर कसोटीत अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताची अवस्था ४ बाद १४५ अशी होती. अशा अडचणीच्या वेळी श्रेयसने सूत्रे हाती घेतील आणि जडेजासह शतकी भागिदारी करून संघाला सुस्थितीत नेले. पहिल्या दिवशी श्रेयसने नाबाद ७५ धावा केल्या होत्या. तेव्हाच तो शतक करेल असे वाटले होते. दुसऱ्या दिवसाच्या डावाला सुरूवात झाली आणि २५ धावा करण्यास त्याने फार वेळ घेतला नाही. काल ज्याच्यासोबत शतकीभागिदारी केली तो जडेजा बाद झाल्यानंतर देखील श्रेयस संयम ठेवला आणि पदार्पणात शतक करण्याचा विक्रम केला.त्याने १५७ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०० धावा केल्या.

वाचा- कोण आहे मोहक कुमार? १२५ चेंडूत ३० षटकार आणि २८ चौकारांसह केल्या इतक्या धावा

भरताकडून कसोटी पदार्पणात शतक करणारा तो १६वा खेळाडू ठरला आहे. तर न्यूझीलंडविरुद्ध अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय खेळाडू आहे. वयाचा विचार करता तो सर्वाधिक वय असलेल्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरलाय. भारताकडून कसोटी पदार्पणात शतक करणारा तो १६वा खेळाडू ठरला आहे. तर न्यूझीलंडविरुद्ध अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय खेळाडू आहे. वयाचा विचार करता तो सर्वाधिक वय असलेल्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरलाय.

गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर श्रेयस अय्यर हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे ज्याने कानपूरच्या मैदानावर शतक झळकावले. तर मुंबईचा तिसरा खेळाडू ज्याने पदार्पणात शतक केले. याआधी प्रवीण आमरे यांनी १९९२ साली पदार्पणात अशी कामगिरी केली होती. तर रोहित शर्माने देखील पदार्पणात शतक केले होते.

प्रथम श्रेणीत धमाकेदार रेकॉर्ड

श्रेयसने २०१९ पर्यंत ५२.१८च्या सरासरीने ४ हजार ५९२ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट देखील ८१.५४ इतका आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: