महागाई सामान्यांना धुवून काढणार! साबण आणि डिटर्जंट पावडरच्या किंमतीत मोठी वाढ


हायलाइट्स:

  • हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी कंपन्यांनी साबण आणि डिटर्जेंटच्या किंमतीत वाढ केली.
  • व्हील डिटर्जेंट पावडर, रिन बार आणि लक्स साबण यांच्या किमती ३.४ ते २१.७ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.
  • वाढती महागाई नजीकच्या काळात सामान्यांना धुवून काढणार आहे.

मुंबई : सामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी कंपन्यांनी साबण आणि डिटर्जेंटच्या किंमतीत वाढ केली. व्हील डिटर्जेंट पावडर, रिन बार आणि लक्स साबण यांच्या किमती ३.४ ते २१.७ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. त्याचवेळी, आयटीसीने फियामा साबणाच्या किंमतीत १० टक्के, विवेलमध्ये ९ टक्के आणि ऐंगेज डियोड्रंटमध्ये ७.६ टक्के वाढ केली आहे. वाढती महागाई नजीकच्या काळात सामान्यांना धुवून काढणार आहे.

संपत्ती वाटपाच्या नियोजनात मुकेश अंबानी मग्न;जगप्रसिद्ध वॉल्टन कुटुंबाचे माॅडेल स्वीकारणार
किंमती वाढीचे कारण
बातम्यांच्या मते, दोन प्रमुख उपभोक्ता वस्तू (एफएमसीजी) कंपन्यांनी उत्पादन खर्च वाढल्याने किंमतींमध्ये वाढ केली आहे, असे कारण सांगितले आहे. व्हील डिटर्जेंटच्या १ किलो पॅकच्या किंमतीमध्ये एचयूएलने ३.४ टक्के वाढ केली आहे. यामुळे ते २ रुपयांनी महाग झाले आहे. ५०० ग्रॅम व्हील पावडरच्या किंमतीत कंपनीने दोन रुपये वाढविले आहेत. ही किंमत आता २८ रुपयांवरून ३० रुपये झाली आहे.

२५ रुपयांनी महाग झाला साबण
रिन बारच्या २५० ग्रॅम पॅकची किंमत ५.८ टक्के वाढली आहे. एफएमसीजीची मोठी कंपनीने लक्स साबण १०० ग्रॅम मल्टीपॅक २१.७ टक्के म्हणजेच २५ रुपयांनी वाढली आहे. त्याच वेळी, आयटीसीने फियामा साबण १०० ग्रॅम पॅकची किंमत १० टक्क्यांनी वाढविली आहे. तर कंपनीने विवेल साबणाच्या १०० ग्रॅम पॅकची किंमतीत ९ टक्क्यांनी वाढ केली आहे. या अहवालात असे म्हटले आहे की कंपनीने १५० मिली ऐंगेज डियोड्रंटच्या किंमतीत ७.६ टक्के आणि १२० मिलीच्या ऐंगेज परफ्युममध्ये ७.१ टक्क्यांची वाढ केली आहे.

दरम्यान, किंमत वाढविण्याच्या मागे दिलेल्या स्पष्टीकरणात कंपन्यांनी असे म्हटले आहे की, त्यांनी निवडक गोष्टींच्या किंमतीत बदल केला आहे. ग्राहकांवर किंमत वाढीचा पूर्ण दबाव पडणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे. दुसऱ्या तिमाहीत हिंदुस्तान युनिलिव्हर वार्षिक आधारावर ९ टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा नफा २१८७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो अंदाजापेक्षा थोडासा कमी आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: