धक्कादायक, केन विलियमसन असा कसा वागला; अंपायर्सनी मॅच थांबवली आणि…


कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर पहिला कसोटी सामना सुरू आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताची सुरुवात फार समाधानकारक झाली नव्हती. पण त्यानंतर दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रेयस अय्यर आणि रविंद्र जडेजा यांच्या भागिदारीमुळे भारताने २५०चा टप्पा गाठला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रेयसने पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी केली.

वाचा- श्रेयसने निराश केले नाही; पदार्पणाच्या कसोटीत शतकासह केला विक्रम

सामन्याच्या पहिल्या दिवशी अशी एक घटना घडली ज्यामुळे भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला. केन विलियमसन हा न्यूझीलंडचा कर्णधार असला तरी भारतीय चाहत्यांमध्ये तो लोकप्रिय आहे. केनने मैदानावरील त्याच्या वागण्याने अनेकदा चाहत्यांची मन जिंकली आहेत. पण अशा केनला असे काही कृत्य केले की अंपायर्सना सामना थांबवावा लागला आणि त्याला समज द्यावी लागली.

वाचा- श्रेयस अय्यरने ते स्वप्न पूर्ण केले; ४ वर्ष झाली वडिलांनी Whatsappचा डीपी बदलला नाही

पहिल्या दिवशी भारताची अवस्था ४ बाद १४५ अशी झाली होती. टीम इंडियाचा डाव गडगडणार असे वाटत असताना अय्यर आणि जडेजा जोडीने धावांचा वेग वाढवला. न्यूझीलंडला विकेट मिळेना आणि धावा देखील थांबेनात. विकेट मिळवण्यासाठी केनने फिरकीपटू एजाज पटेलला लेग स्टंपवर गोलंदाजी करण्यास सांगितले. ७७व्या षटकात पटेलची ओव्हर मध्येच थांबवण्यात आली आणि अंपायर विरेंद्र शर्मा यांनी केनला बोलवले. केनला समज देण्यात आली ही ही नेगेटिव्ह गेम प्लॉन आहे. असेच खेळला तर मॅच सुरू करता येणार नाही. तुम्ही सातत्याने लेग स्टंपच्या दिशेने किंवा त्यापासून दूर गोलंदाजी करू लागला तर सामन्याची लय तुटेल.

वाचा- अजिंक्य रहाणेच्या ‘त्या’ एका निर्णयामुळे श्रेयसचे पदार्पण लांबले; ४ वर्षापूर्वी खेळला असता कसोटी

अंपायरने समज दिल्यानंतर विलियमसनने गोलंदाज पटेलला देखील तसा निरोप दिला. त्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पुन्ह विकेटची लाईन पकडून गोलंदाजी सुरू केली.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: