ट्रॅक्टर चालवत असताना घडली दुर्घटना; चालकाचा जागीच मृत्यू!


हायलाइट्स:

  • मालसेलू येथे रेल्वे रुळाजवळ घडली दुर्घटना
  • ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू
  • गावावर पसरली शोककळा

हिंगोली : हिंगोली तालुक्यातील मालसेलू येथे रेल्वे रुळाजवळ ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. रामकिसन भगाजी वामन (वय ५० वर्ष) असं मृत चालकाचं नाव आहे. (Hingoli Accident News Today)

रामकिसन वामन हे ब्लास्टिंगच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होते. मात्र गुरुवारी सायंकाळी अकोला-पूर्णा रेल्वे रुळाचे रूंदीकरणाचे काम सुरू असताना रामकिसन यांचा ट्रॅक्टर पलटी झाला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

anna hajare: अण्णांची प्रकृती ठणठणीत; रूटीन चेकअपसाठी रूबी हॉस्पिटलमध्ये

ट्रॅक्टर मागे घेताना थेट खदानीमध्ये उतरल्यामुळे सदरील अपघात घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. रामकिसन हे शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंड असा परिवार आहे.

दरम्यान, या घटनेमुळे माळहिवरा गावावर शोककळा पसरली आहे. अद्याप तरी याप्रकरणी कुठल्याही गुन्ह्याची नोंद झालेली नाही.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: