param bir singh: परमबीर सिंहांची ७ तास कसून चौकशी; बाहेर आले आणि म्हणाले…


हायलाइट्स:

  • परमबीर सिंह यांची कांदिवली गुन्हे शाखेने केली ७ तास चौकशी.
  • सिंह यांना आज शुक्रवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
  • मी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तपासासाठी हजर झालेलो आहे- परमबीर सिंह.

मुंबई: गोरेगावातील वसुली प्रकरणी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची आज कांदिवली गुन्हे शाखा युनिट क्रमांक ११ च्या कार्यालयात तब्बल ७ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर सिंह यांना सोडण्यात आलं. आज शुक्रवारी त्यांना पुन्हा चौकसीसाठी बोलावण्यात आलं आहे. गुरुवारच्या दीर्घ चौकशीनंतर बाहेर आल्यानंतर परमबीर सिंह यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांपुढे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (after a lengthy seven hour interrogation former mumbai police commissioner parambir singh responded to the media)

अशी होती परमबीर सिंह यांची पहिली प्रतिक्रिया

सात तासांच्या दीर्घ चौकशीनंतर कांदिवली गुन्हे शाखेतून बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी परमबीर सिंह यांना गराडा घातला. त्यावेळी बोलताना परमबीर सिंह म्हणाले की मी आज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तपासासाठी हजर झालेलो आहे. सर्वोच्च न्यायालयाचा मला आदर आहे. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई होईल, याशिवाय आणखी काही मला बोलायचं नाही.

क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज दैनंदिन मृत्यू वाढले; नवे रुग्ण मात्र घटले, पाहा ताजी स्थिती!

दरम्यान, या चौकशीवेळी परमबीर सिंह यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले असल्याची माहिती मिळत आहे. सचिन वाझे आणि विमल अग्रवाल यांच्यात नेमके काय झाले याबाबत आपल्याकडे काहीही माहिती नसल्याचे सिंह यांनी तपासअधिकाऱ्यांना सांगितले. सचिन वाझे याने आमच्या नावावर जे जे काही जमा केलेले आहे, त्याबाबत आपल्याला जराही कल्पना नसल्याचे सिंह म्हणाले. तसेच माझ्यावर जे जे काही आरोप करण्यात आले आहेत, त्या सर्व आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचंही ते चौकशीदरम्यान म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- मुंबई विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार; कोपरकरांचा उमेदवारी अर्ज मागे

दरम्यान, अनेक वेळा चौकशीसाठी समन्स पाठवल्यानंतरही परमबीर सिंह हे हजर होत नाहीत हे पाहिल्यावर मुंबई पोलिसांनी सिंह यांना फरार घोषित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुंबईच्या शहर दिवाणी न्यायालयाने सिंहांना फरार घोषित केलं होतं. तसेच जर सिंह हे ३० दिवसांच्या आत हजर झाले नाहीत, तर त्यांची संपत्ती जप्त केली जाईल, असेही न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर काल गुरुवारी सिंह मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झाले.

क्लिक करा आणि वाचा- कन्नड घाटात पोलिसांची वसुली; ट्रकचालक बनून आमदार चव्हाणांनी केला भांडाफोडSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: