‘पेटीएम’चा यू-टर्न अन् गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात! तीन सत्रात शेअरने केली २९ टक्क्यांची भरपाई


हायलाइट्स:

  • पेटीएमची पालक कंपनी ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’चा शेअर सलग तीन सत्रात २९ टक्क्यांनी वधारला.
  • या अनपेक्षित तेजीने नोंदणीवेळी होरपळेल्या गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात पडला.
  • आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आयपीओ ठरला मात्र निराशाजनक लिस्टींगमुळे तो तितकाच गाजला .

मुंबई : तब्बल १८३०० कोटींचे विक्रमी भांडवल उभारताना किरकोळ तसेच संस्थात्मक गुंतवणूकदारांना जोरदार झटका देणाऱ्या वन ९७ कम्युनिकेशनच्या शेअरने भांडवली बाजारात जोरदार कमबॅक केला आहे. पेटीएमची पालक कंपनी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन्सचा शेअर सलग तीन सत्रात २९ टक्क्यांनी वधारला. या अनपेक्षित तेजीने नोंदणीवेळी होरपळेल्या गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात पडला.

क्रिप्टोकरन्सीचा फुगा लवकरच फुटेल; माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा इशारा म्हणाले…
आज गुरुवारी मुंबई शेअर बंद होताना वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडचा शेअर २.४८ टक्क्यांनी वधारला आणि तो १७९६.५५ रुपयांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मंचावर वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या शेअरमध्ये २.६४ टक्के वाढ झाली. तो ४६.३० रुपयांच्या तेजीसह १७९८.७५ रुपयांवर बंद झाला.

या सहकारी बँंकेची आर्थिक स्थिती खालावली ; रिझर्व्ह बँंकेनं सहा महिन्यांसाठी घातले निर्बंध
यापूर्वी काल बुधवारी पेटीएमच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडचा शेअर कालच्या सत्रात १७.३ टक्क्यांनी वधारला होता आणि १७५३.२ रुपयांवर बंद झाला होता. त्याआधीच्या सत्रात मंगळवारी २३ नोव्हेंबर रोजी वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड ९.९ टक्क्यांनी वधारून १४९५ रुपयांपर्यंत पोहोचला होता.

स्टार हेल्थ इन्शुरन्सचा IPO; राकेश झुनझुनवाला यांना होणार बंपर फायदा, केलीय मोठी गुंतवणूक
पेटीएमची पालक कंपनी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने समभाग विक्रीतून १८३०० कोटीचे भांडवल उभारले होते. मात्र गुंतवणूकदारांसाठी पेटीएमची नोंदणी धक्कादायक ठरली. आतापर्यंतचा भांडवली बाजारातील हा सर्वात मोठा आयपीओ ठरला मात्र निराशाजनक लिस्टींगमुळे तो तितकाच गाजला होता.

शेअर बाजार तेजीत; सेन्सेक्सची ५०० अंकांची झेप, गुंतवणूकदार ५० हजार कोटींनी मालामाल
१८ नोव्हेंबर २०२१ रोजी वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडची नोंदणी झाली. मात्र पहिल्याच दिवशी वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडचा शेअर तब्बल २७.२ टक्क्यांनी कोसळला. आयपीओमध्ये शेअर प्राप्त झालेल्या गुंतवणूकदारांना प्रती शेअर ५८५.९ रुपयांचे नुकसान सोसावं लागले. सोमवारी २२ नोव्हेंबर २०२१ रोजी जेव्हा बाजार सुरु झाला तेव्हा पेटीएमच्या शेअरवर विक्रीचा दबाव कायम होता. त्यात दिवसअखेर वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडचा शेअर १३ टक्क्यांच्या घसरणीसह १३६०.३ रुपयांपर्यंत खाली आला होता. आयपीओ योजनेत पेटीएमने शेअरची इश्यू प्राईस २१५० रुपये निश्चित केली होती.

सलग दुसऱ्या दिवशी सोने महागले ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव
वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने पेटीएमचे अवाजवी मूल्य दाखवले. कंपनीवर ३००० कोटींचा तोटा आहे. त्यामुळे नजीकच्या काळात शेअर आणखी घसरेल असे अंदाज वर्तवण्यात आले. काही विश्लेषकांनी पेटीएमचे वास्तविक मूल्य ७०० ते ८०० रुपये आहे. शेअर १२०० रुपयांपर्यंत खाली घसरेल, असे अंदाज व्यक्त केले होते. मात्र मंगळवारी वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या शेअरने यू-टर्न घेतला आणि तेजीची वाट धरली.

पीएफ खातेदारांसाठी महत्वाची बातमी; ई-नॉमिनेशन करणे झाले बंधनकारक, वाचा सविस्तर
सलग तीन सत्रात वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या शेअरने २९ टक्के भरपाई केली आहे. ज्यामुळे सूचीबद्ध होताना अपेक्षाभंग झालेल्या गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात पडला आहे.पेटीएमच्या अवाजवी बाजार मूल्यावर प्रश्न निर्माण करणाऱ्या सल्लागारांसाठी ही तेजी अचंबित करणारी आहे. शेअरने कमबॅक केल्याने कंपनीच्या बाजार भांडवलाची देखील भरपाई झाली आहे.

वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या शेअरची आतापर्यंतची कामगिरी

तारिखबंद भावबदल (रुपयांत)बदल (टक्क्यांमध्ये)
२५ नोव्हेंबर २०२११७९६.५५४३.४०२.४८
२४ नोव्हेंबर २०२११७५३.२०२५८.२०१७.३
२३ नोव्हेंबर २०२११४९५.००१३४.७०९.९०
२२ नोव्हेंबर २०२११३६०.३०-२०३.९०१३.००
१८ नोव्हेंबर २०२१ (नोंदणीचा दिवस)१५६४.२०-५८५.९०२७.२०Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: