सानिया मिर्झा पती शोएब मलिकसह झळकणार मोठ्या पडद्यावर; ओपनिंगपूर्वीच व्हिडीओ झाला व्हायरल…


पुणे : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा पती पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक हे नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या सानियाचे जगभरात लाखो चाहते आहेत. नुकताच या दोघांनी आपापल्या इन्स्टाग्राम पेजवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.

खरंतर हा व्हिडिओ मालिका, चित्रपट किंवा जाहिरातीच्या प्रोजेक्टचा टीझर असल्याचे दिसून येते. सानिया आणि शोएब दोघांनीही त्यांच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये हा दोघांचा कॉमन प्रोजेक्ट असल्याची माहिती दिली आहे. या दोन्ही पोस्टच्या कॅप्शनमध्ये आणखी एक गोष्ट साम्य आहे, ती म्हणजे लव्ह इज इन द एअर हा हॅशटॅग (#LoveIsInTheAir). ज्यामुळे आगामी प्रोजेक्टचे नाव असू शकते असा अंदाज बांधला जात आहे.

सानिया मिर्झाने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, ‘मी काम करत असलेल्या प्रोजेक्टचा टीझर शेअर करण्यास उत्सुक आहे. त्याची पूर्ण आवृत्ती लवकरच येत आहे.” तर शोएब मलिकने लिहिले आहे की, ”आमच्या प्रोजेक्टचा हा टीझर शेअर करताना मला अभिमान वाटतो. लवकरच तुम्हाला त्याची पूर्ण आवृत्ती मिळेल.” ही कोणती मालिका आहे की चित्रपट, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण नेटकऱ्यांनी त्यांचे त्यांचे अंदाज वर्तविले आहेत. कोणी हा चित्रपट असल्याचे म्हणत आहे, तर कोणी या दोघांच्या प्रेमकथेवर आधारित मालिका असल्याचे म्हटले आहे.

या व्हिडिओमध्ये सानियाचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही, पण तिचा पती शोएब मलिक अनेक ठिकाणी दिसत आहे. शोएब धावताना दिसत आहे, तसेच एका सीनमध्ये तो कारमधून उतरतानाही दिसत आहे. एक महिला पांढऱ्या रंगाच्या कपड्यात टेनिस खेळताना दिसत असून ती सानिया मिर्झा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

खेळासोबतच सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही खूप चर्चा आहे. २०१० पासून त्यांच्या प्रेमाची चर्चा सुरू झाली होती. यानंतर शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांनी १२ एप्रिल २०१० रोजी हैदराबादमध्ये पारंपरिक सोहळ्यात लग्नगाठ बांधली. आज त्यांना इझहान मिर्झा मलिक नावाचा तीन वर्षांचा मुलगाही आहे.

Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: