धक्कादायक! प्रेम झाल्यानंतर तरुणीला भेटायला गेला आणि लाखो रुपये गमावले: कोल्हापुरात गेल्या आठवड्यात एका कापड व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये गुंतवून अडीच लाख रुपयांचा गंडा घातला असून हॅनी ट्रॅपमध्ये अडकलेले व्यापारी आता तक्रार देण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका व्यापाऱ्याला सोनाली (बदललेले नाव) आणि तिच्या सहकाऱ्यांनी एक लाखाचा गंडा घातला आहे. ()

सोनालीने फेसबुकवर व्यापाऱ्याशी मैत्री केली. त्यानंतर चॅटिंग सुरू केली आणि व्यापाऱ्याने तिला भेटायला बोलावले. सुरुवातीला भेटायला आढेवेढे घेणाऱ्या सोनालीने व्यापाऱ्याला भेटायचं कबूल केले. दोघेही कारने शिवाजी चौक, तावडे हॉटेल मार्गे सादळे मादळे येथे गेले. तिथे सोनालीने व्यापाऱ्याला हॉटेलची रुम भाड्याने घेण्यास भाग पाडलं. व्यापारीही एका पायावर तयार झाला.

हॉटेलमध्ये गेल्यावर सोनाली वॉशरुममध्ये गेली आणि थोड्या वेळाने वस्त्रहिन अवस्थेत बाहेर आले. त्याचवेळी दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. व्यापाऱ्याने दरवाजा उघडताच पाच ते सहा जण खोलीत घुसले. त्यातील एक जण ‘माझ्या बहिणीची अब्रू लुटलीस’ म्हणाला तर दुसरा ‘माझ्या पत्नीची अब्रू लुटली’ असं म्हणाला. तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो, असं म्हणत त्याच्या खिशातील पाच हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर व्यापाऱ्याला त्याच्याच कारमध्ये कोंबून कार कुशीरे घाटात नेण्यात आली. तिथे व्यापाऱ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसंच पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी दिली.

अखेर व्यापाऱ्याने गयावया केल्यावर सोनूच्या साथीदारांनी ५० लाख रुपये मागितले. अखेर तडजोडीअंती दहा लाख रुपये देण्याचं ठरलं. व्यापाऱ्याने दोन नोव्हेंबरला एक लाख रुपये दिले. बाकी नऊ लाख रुपये देण्यासाठी फोनवर धमक्या येण्यास सुरूवात केली. अखेर व्यापाऱ्याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर सोनाली आणि तिच्या सहकाऱ्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.

दरम्यान, दुसऱ्या हॅनी ट्रॅपच्या गुन्ह्यातील तरुणीने शिरोली एमआयडीसीतील भांडी व्यापाऱ्याला हॅनी ट्रॅपमध्ये ओढले. या गुन्ह्यातील तरुणी अल्पवयीन असून तिचा विवाह झाला आहे. ती व तिचा पती या गुन्ह्यातील मुख्य संशयित असून आणखी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. एप्रिल २०१९ पासून ही तरुणी आणि तिच्या सहकाऱ्याने व्यापाऱ्यांकडून बलात्काराचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी देऊन तब्बल ३५ लाख रुपये उकळले आहेत.

या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या तरुणीने एका पंचायत समितीतील एका सदस्यालाही हॅनी ट्रॅपमध्ये पाच ते सात लाख रुपयाला फसवलं असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी पंचायत समिती सदस्याला चौकशीला बोलावलं असून पुढील तपास करण्यात येत आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: