शेअर बाजार तेजीत; सेन्सेक्सची ५०० अंकांची झेप, गुंतवणूकदार ५० हजार कोटींनी मालामाल


हायलाइट्स:

  • गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने आज गुरुवारी शेअर निर्देशांकात मोठी वाढ झाली.
  • मुडीज या पत मानांकन संस्थेनं आर्थिक वर्ष २०२२ मध्ये भारताचा विकासदर ९.३ टक्के राहील, असा अंदाज वर्तवला आहे.
  • अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत असल्याने विकासदर वेग घेईल, असे मुडीजने म्हटलं आहे.

मुंबई : गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने आज गुरुवारी शेअर निर्देशांकात मोठी वाढ झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ४५४ अंकांनी वधारला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १२१ अंकांनी वाढला. आजच्या तेजीने गुंतवणूकदारांची मालमत्ता ५० हजार कोटींनी वाढली.

सलग दुसऱ्या दिवशी सोने महागले ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव
सेन्सेक्स मंचावरील ३० पैकी १५ शेअर तेजीसह बंद झाले. ज्यात रिलायन्स, टायटन, इन्फोसिस, टेक महिंद्रा, आयटीसी, भारती एअरटेल, पाॅवरग्रीड, सन फार्मा, कोटक महिंद्रा बँक, एचसीएल टेक, नेस्ले, एचडीएफसी बँक, टीसीएस, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट या शेअरमध्ये वाढ झाली. तर दुसऱ्या बाजूला डॉ. रेड्डी लॅब, एचडीएफसी, एसबीआय, बजाज फायनान्स, टाटा स्टील, एचयूएल, बजाज ऑटो, एक्सिस बँक, एल अँड टी, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक आदी शेअर घसरणीसह बंद झाले.

पीएफ खातेदारांसाठी महत्वाची बातमी; ई-नॉमिनेशन करणे झाले बंधनकारक, वाचा सविस्तर
मुडीज या पत मानांकन संस्थेनं आर्थिक वर्ष २०२२ मध्ये भारताचा विकासदर ९.३ टक्के राहील, असा अंदाज वर्तवला आहे. करोना लसीकरणाला मिळालेली चालना आणि अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत असल्याने विकासदर वेग घेईल, असे मुडीजने म्हटलं आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये एक आश्वासक वातावरण निर्माण झाले.

क्रिप्टोकरन्सीचा फुगा लवकरच फुटेल; माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा इशारा म्हणाले…
शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बुधवारी बाजारात ५१२२ कोटींची विक्री केली. तर स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ३८०९ कोटीचे शेअर खरेदी केले. बुधवारच्या सत्रात सेन्सेक्स ३२३ अंकांनी वधारला होता. तर निफ्टीत ८८ अंकाची वाढ झाली होती.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: