anna hajare: अण्णांची प्रकृती ठणठणीत; रूटीन चेकअपसाठी रूबी हॉस्पिटलमध्ये


हायलाइट्स:

  • ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल.
  • अण्णांची तब्येत ठणठणीत असून काळजीचे कोणतेही कारण नाही- अण्णांच्या कार्यालयातून झाले स्पष्ट.
  • विश्रांतीसाठी आजची रात्र अण्णा रुग्णालयातच थांबतील.

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल झाले असून त्यांच्या हृदयात छोटे ब्लॉकेज आढळल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र,अण्णांची तब्येत ठणठणीत असून काळजीचे कोणतेही कारण नाही, असे अण्णांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे. (anna hazares health is in normal condition and has been admitted to ruby hospital for routine checkups)

अण्णा हजारे काल दिवसभर कार्यकर्त्यांच्या शिबिरात होते. त्यांचे दैनंदिन कामकाज सुरू आहे. गेले दीड वर्ष कोरोना स्थितीमुळे अण्णांचे रूटीन चेकअप करण्यात आलेले नव्हते. काल डॉ. धनंजय पोटे व डॉ. हेमंत पालवे यांनी प्राथमिक तपासण्या केल्यानंतर वयानुरुप पुढील तपासण्या रुबी हॉलला करण्याची सूचना केली.

क्लिक करा आणि वाचा- मुंबई विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार; कोपरकरांचा उमेदवारी अर्ज मागे

त्यानुसार अण्णांना आज विविध तपासण्या करण्यासाठी रुबी हॉल, पुणे येथे आणण्यात आले आहे. झालेल्या सर्व तपासण्यांचे रिपोर्ट नॉर्मल असल्याचे डॉ. ग्रँट यांनी सांगितले आहे. कोणताही त्रास नसला तरी वयानूरूप प्रिकॉशन म्हणून डॉक्टरांनी एन्जिओग्राफी केली असून तेही रिपोर्ट अगदी नॉर्मल आहेत.

क्लिक करा आणि वाचा- कन्नड घाटात पोलिसांची वसुली; ट्रकचालक बनून आमदार चव्हाणांनी केला भांडाफोड

विश्रांतीसाठी आजची रात्र अण्णा रुग्णालयातच थांबतील. सकाळी उर्वरीत तपासण्या करून अण्णा राळेगणला परततील. अण्णांच्या प्रकृतीविषयी कार्यकर्त्यांनी आजिबात काळजी करण्याचे कारण नाही, असे राळेगणसिद्धीचे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यायाचे संजय पाठाडे यांनी माहिती देताना सांगितले आहे.

क्लिक करा आणि वाचा- जावयाला रुग्णालयात नेत असताना झाला भीषण अपघात; चालकासह महिला ठारSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: