पराभवानंतर शशिकांत शिंदे यांची खळबळजनक पत्रकार परिषद; ‘या’ नेत्यांवर थेट आरोप


सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांना अवघ्या एका मताने पराभव पत्करावा लागला. शिंदे यांच्या पराभवानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आणि या पराभवामागे राष्ट्रवादीतीलच काही नेत्यांचा हात असल्याची चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale Vs Shashikant Shinde) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

‘मला पाडण्यात संपूर्णपणे शिवेंद्रराजे भोसले यांचा हात असून त्यांना राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी मदत केली,’ असा दावा शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

मुंबई विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार; कोपरकरांचा उमेदवारी अर्ज मागे

राष्ट्रवादीतूनच विरोधकांना मदत होते, याची खंत बोलून शशिकांत शिंदे म्हणाले की, ‘साताऱ्यातील मुख्य नेतेच विरोधकांना सोबत घेऊन खलबतं करतात, त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या भवितव्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.’ यावेळी शिंदे यांच्या बोलण्याचा रोख हा राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे होता.

anna hajare: अण्णांची प्रकृती ठणठणीत; रूटीन चेकअपसाठी रूबी हॉस्पिटलमध्ये

‘साताऱ्यातून चारही राजे बिनविरोध झाले, मात्र मी राजा नाही. त्यामुळे मी बिनविरोध झालो नाही,’ असा टोलाही शशिकांत शिंदे यांनी भाजपसह स्वपक्षातील विरोधकांना लगावला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्या विजयासाठी मतदानाच्या दिवसापर्यंत प्रयत्न केले, असंही शशिकांत शिंदे म्हणाले.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: