थेट रुग्णालयातून मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित; उपचाराबाबत म्हणाले…


हायलाइट्स:

  • मंत्रिमंडळ बैठकीला उद्धव ठाकरेंची उपस्थिती
  • सहकाऱ्यांचे मानले आभार
  • उपचाराबाबतही दिली माहिती

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना मणक्याचा त्रास जाणवत असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृह येथे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting Update) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन उपस्थिती होती. मुख्यमंत्री हे एच.एन.रिलायन्स रुग्णालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बैठकीच्या सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

बैठकीत ऑनलाईन उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, या आजारपणात आपण सर्व जण सहकार्य करत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली फिजीओथेरपी व्यवस्थित सुरू आहे, असंही ते म्हणाले.

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कधी होणार?; ‘या’ तारखेला महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता

मंत्रिमंडळ बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?

मंत्रिमंडळ बैठकीत कोव्हिड परिस्थिती, लसीकरण, पीक पाणी परिस्थिती आदी विषयांवर चर्चा झाली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी संपासंदर्भात राज्य शासनाने उचललेल्या पावलांची माहिती मंत्रीमंडळास दिली.

कमाल झाली! पनवेल महापालिकेचा अर्थसंकल्प आठ महिन्यांनी मंजूर

दरम्यान, ‘कोविड परिस्थिती युरोपमध्ये बिकट होत असून आपण देखील महाराष्ट्रात पुरेशी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे, कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावं, तसंच चाचण्या वाढवाव्यात. कोविडचा धोका पूर्णपणे गेलेला नाही त्यामुळे आरोग्याचे नियम पाळण्यासाठी सर्वानी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत,’ या मुद्द्यांवरही मंत्रिमंडळ सदस्यांनी चर्चा केली.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: