कन्नड घाटात पोलिसांची वसुली; ट्रकचालक बनून आमदार चव्हाणांनी केला भांडाफोड


हायलाइट्स:

  • भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी कन्नड घाटात केले स्टिंग ऑपरेशन.
  • आमदार चव्हाण यांनी स्वत: ट्रक चालक बनून केली परिस्थितीची पाहणी.
  • कन्नड घाटात पोलिस करतात ट्रक चालकांकडून वसुली- आमदार मंगेश चव्हाण.

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या कन्नड घाटात चाळीसगाव पोलिसांकडून ट्रकचालकांकडून जबरजस्तीने वसुली केली जात आहे. घाट बंद असतांना देखील ट्रकचालकांकडून जबरीने १०० ते १००० रुपये घेवून पोलिसांकडून गाड्या सोडल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी उघडकीस आणला आहे. आमदार चव्हाण यांनी स्वत: ट्रक चालवित आणून या प्रकाराचे स्ट्रिंग ऑपरेशन केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या वसुली करणाऱ्यांनी आमदारांना शिव्या दिल्याचेही दृश्य चित्रित झाले आहे. (BJP MLA Mangesh Chavan became a truck driver and exposed the recovery)

चाळीसगाव तालुक्यातील अवजड वाहनांसाठी बंद असलेल्या कन्नड घाटात महाराष्ट्र पोलीस ट्रक चालकांकडून कशा प्रकारे पैसे वसुली करतात याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, याची खात्री करण्यासाठी चाळीसगांव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ट्रकचालकाने वेषांतर करत स्टिंग ऑपरेशन केले. त्यांनी स्वतः अजवड ट्रक चालवत कन्नड घाटात नेला.

क्लिक करा आणि वाचा- जावयाला रुग्णालयात नेत असताना झाला भीषण अपघात; चालकासह महिला ठार

आमदारांनाही मागितले पैसे

त्याठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्यांच्याकडे ५०० रुपयांची मागणी केली असता त्यांनी थोडे कमी करा अस सांगत ५०० रुपये पोलिसांच्या हातात दिले व बाकी पैसे परत मागितले असता सदर पोलिसाने ते देण्यास नकार दिला. नंतर ड्रायव्हर बनलेले आमदार मंगेश चव्हाण यांनी बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांना जवळ बोलावले व हा बाकी पैसे परत देत नसल्याचे सांगितले. तेव्हा त्यातील एक पोलीस शिवीगाळ करायला लागला. त्यानतंर मात्र, आमदार मंगेश चव्हाण यांनी खाली उतरून पोलिसांशी बोलायला सुरुवात करताच काही पोलिसांनी आमदारांना ओळखले व त्यांनी पळ काढला. या घटनेनतंर आमदार चव्हाण यांनी या ठिकाणी असलेल्या ट्रकचालकांची चर्चा केली. त्या चालकांनी या ठिकाणी नेहमी वसुली केली जात असल्याचे सांगीतले.

क्लिक करा आणि वाचा- ‘कितीही चौकशा लावा, आम्ही घाबरत नाही’; शरद पवार केंद्र सरकारवर गरजले

हे तर वसुली सरकार !

दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना प्रवेश बंद असलेल्या कन्नड घाटात पोलिसांकडून ५०० ते १००० रुपये प्रति अवजड वाहन घेऊन त्यांना सोडण्यात येते, यामुळे अनेकदा घाट जाम होऊन ५ ते १० तास घाट जाम होतो, गंभीर रुग्ण घेऊन जाणाऱ्या एम्ब्युलन्स तासंतास अडकून पडतात. यामुळे पूर्ण राज्यात चाळीसगाव तालुक्याचे नाव बदनाम होत असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगीतले आहे.

क्लिक करा आणि वाचा- ममता बॅनर्जींंचा मुंबई दौरा; घेणार उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेटSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: