क्रेडिट कार्डस् केली सादर ; इक्विटस स्‍मॉल फायनान्‍स बँंक आणि एचडीएफसी बँंकेत करार


हायलाइट्स:

  • हे क्रेडिट कार्ड दोन विभागांमध्‍ये उपलब्‍ध होऊ शकते.
  • हे क्रेडिट कार्डस् इक्विटस स्‍मॉल फायनान्‍स बँकेच्‍या ग्राहकांसाठी उपलब्‍ध असतील.
  • दोन्‍ही विभाग सर्व ग्राहकांना बहुमूल्‍य रिवॉर्डस् प्रोग्राम्‍स देतील, असे बँकेने म्हटलं आहे.

मुंबई :इक्विटस स्‍मॉल फायनान्‍स बँक लिमिटेडने नुकताच एचडीएफसी बँकेसोबत सहयोगाची घोषणा केली. या सहयोगांतर्गत नवीन को-ब्रॅण्‍डेड क्रेडिट कार्डस् सादर केले. हे क्रेडिट कार्डस् इक्विटस स्‍मॉल फायनान्‍स बँकेच्‍या ग्राहकांसाठी उपलब्‍ध असतील. यामागे ग्राहकांना बँकिंग इकोप्रणालीच्‍या सुविधा देण्‍यात येईल.

क्रिप्टोकरन्सीचा फुगा लवकरच फुटेल; माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा इशारा म्हणाले…
हे क्रेडिट कार्ड दोन विभागांमध्‍ये उपलब्‍ध होऊ शकते. पहिला विभाग आहे ‘एक्‍साईट क्रेडिट कार्ड’,जे २५००० रूपये ते २ लाख रूपयांपर्यंत पत मर्यादा देते आणि दुसरा विभाग आहे ‘एलीगन्‍स क्रेडिट कार्ड’,जे २ लाख रूपयांपेक्षा अधिक पत देते. हा सहयोग ईएसएफबीसाठी आणखी एक मैलाचा दगड आहे. बचत खातींच्‍या लाभांचा आनंद देण्‍यासोबत हे को-ब्रॅण्‍डेड क्रेडिट कार्ड रिवॉर्ड मिळण्‍यासाठी खर्च करण्‍याची आवड असलेल्‍या ग्राहकांसाठी मूल्‍यवर्धित आहे. दोन्‍ही विभाग सर्व ग्राहकांना बहुमूल्‍य रिवॉर्डस् प्रोग्राम्‍स देतील, असे बँकेने म्हटलं आहे.

पेट्रोल-डिझेल ; सलग २१ व्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला हा निर्णय
झपाट्याने विकसित होणाऱ्या अर्थव्‍यवस्‍थेमधील आधुनिक बँक म्‍हणून एचडीएफसी बँकेसोबतच्‍या आमच्‍या सहयोगामधून आमच्‍या बहुमूल्‍य ग्राहकांना उत्‍पादने व सेवांची सुविधा देण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. मागील पाच वर्षांमध्‍ये उद्योगक्षेत्रामध्‍ये मोठे परिवर्तन होताना निदर्शनास आले आहे असल्याचे मत इक्विटस स्‍मॉल फायनान्‍स बँक लिमिटेडच्‍या ब्रांच बँकिंग – लायबिलिटीज, प्रॉडक्‍ट्स अॅण्‍ड वेल्‍थ विभागाचे वरिष्‍ठ अध्‍यक्ष व कंट्री हेड मुरली विद्यानाथन यांनी व्यक्त केले.

या सहकारी बँंकेची आर्थिक स्थिती खालावली ; रिझर्व्ह बँंकेनं सहा महिन्यांसाठी घातले निर्बंध
एचडीएफसी बँकेच्‍या पेमेण्‍ट्स, ग्राहक फायनान्‍स, डिजिटल बँकिंग व आयटी विभागाचे समूह प्रमुख पराग राव म्‍हणाले, भारताची सर्वात मोठी कार्ड जारी करणारी व प्राप्‍त करणारी बँक म्‍हणून आम्‍ही बँकिंग व पेमेण्‍ट्स इकोप्रणालीमधील सर्व कंपन्‍यांना सामावून घेत देशातील डिजिटायझेशन अवलंबतेला चालना देण्‍याशी कटिबद्ध आहोत. एचडीएफसी बँकेसाठी हा अद्वितीय सहयोग आम्‍हाला कार्डस् विभागामधील आमच्‍या दर्जात्‍मक ऑफरिंग्‍स इक्विटस स्‍मॉल फायनान्‍स बँकेच्‍या ग्राहकांना देण्‍यास, तसेच उच्‍च रिवॉर्डिंग क्रेडिट व अनुभव देण्‍यास सक्षम करेल.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: