आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये; अनिल परब यांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा


हायलाइट्स:

  • एसटी कर्मचारी संपावर ठाम
  • विलिनीकरणाच्या मागणीसाठी आग्रही
  • अनिल परब यांनी केलं आवाहन

मुंबईः राज्यात गेल्या १५ दिवसांपासून अधिक काळ सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत गेल्या काही दिवसांपासून बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत. यावेळी कर्मचार्यांना वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, संपकरी कर्मचारी अजूनही विलगीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. मात्र, परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात उतरलेल्या सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी तूर्तास आंदोलनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा कायम असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आता एसटी कर्मचारी संप मागे घेतील अशी शक्यता असताना आंदोलनाचे नेतृत्व अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी घेतलं आहे. त्यामुळं एसटी संपाचा तिढा कधी सुटणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घडामोडींदरम्यान राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी संपाबाबत पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे.

‘राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही आमचा लेखाजोखा मांडला आहे. खरे तर मागण्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते. आता कर्मचाऱ्यांना कामावर यायचे आहे. आम्ही उद्या सकाळपर्यंत वाट पाहू. त्यानंतर कठोर निर्णय घेऊ, असा इशारा यावेळी अनिल परब यांनी दिला आहे. तसंच, जे संपात राहतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तुटेपर्यंत ताणू नये त्यानंतर जोडता येणार नाही,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

वाचाः
माकडांच्या भांडणात कोसळले मंदिर अन् घडली दुर्दैवी घटना

‘आम्ही उच्च न्यायालय विलीनीकरणार जो निर्णय देईल, ते मान्य करणार आहोत. जे कामगार विलीनीकरणावर ठाम आहेत. त्यांना मला सांगायच आहे मी वारंवार सांगत आहे ही मागणी हायकोर्टाने नेमलेल्या समितीसमोर आहे. त्याला १२ आठवड्याचा कालावधी दिलेला आहे. त्यामुळे १२ आठवडे संप करणे हे परवडणार नाही. आर्थिक परिस्थिती वाईट असताना देखील सरकारने निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा,’ असं आवाहन पुन्हा एकदा अनिल परब यांनी केलं आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: