covid endemic stage : ​करोना संसर्ग एंडेमिक स्टेजमध्ये? नव्या लाटेची चिंताही संपणार? तज्ज्ञ म्हणाले…


नवी दिल्लीः करोना महामारी तिसऱ्या वर्षात प्रवेश करत आहे. यासह कोविड -19 चा संसर्ग हा आता एंडेमिक स्टजवर पोहोचला आहे. याचा अर्थ असा की संसर्ग पसरत राहील, पण त्याची तीव्रता कमी असेल. एखाद्या विशिष्ट भागात किंवा विशिष्ट प्रकारच्या नागरिकांना संसर्गचा धोका असेल, असा अंदाजही बांधता येऊ शकतो. कालांतराने हा आजार फ्लू आणि सर्दीसारख्या सामान्य आजारांसारखा होईल. मात्र हा टप्पा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी सुरू होईल. लोकसंख्येवर या रोगाचा प्रभाव प्रामुख्याने दोन घटकांद्वारे निर्धारित केला जाईल. लसीकरणाची व्यापकता आणि व्हायरसमधील बदल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

ज्या देशांमध्ये लसीकरण कव्हरेज उत्कृष्ट आहे, जसे अमेरिका, ब्रिटन आणि भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येमध्ये संसर्गामुळे करोनाविरूद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे अशा देशांमध्ये करोना संसर्गाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) जुलैमध्ये देशात सीरो सर्वे केला होता. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ८ राज्यांमधील ७० टक्के नागरिकांमध्ये करोनाविरूद्ध अँटीबॉडीज आहेत, असे आयसीएमआरने म्हटले. करोना संसर्ग हा आता एंडेमिक स्टेजवर म्हणजे संपण्याच्या स्तरावर पोहोचला आहे, असं आपण म्हणू शकतो. पण हे लसीकरणामुळे नाही तर नैसर्गिक संसर्गामुळे आहे, असे सीएमसी वेल्लोर येथील क्लिनिकल व्हायरोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख आणि निवृत्त प्राध्यापक डॉ. टी. जैबान जॉन यांनी सांगितले.

booster dose : आता करोना लसीचा बूस्टर डोसही घ्यावा लागेल? ICMR च्या शास्त्रज्ञाने दिले उत्तर

करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत उद्ध्वस्त झालेल्या दिल्लीत गेल्या महिन्यात प्रकाशित झालेल्या सीरो सर्वेक्षण अहवालानुसार ९० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला करोनाविरूद्ध प्रतिकारशक्ती मिळाली आहे. म्हणजेच राजधानी दिल्ली नवीन लाट येण्याची शक्यता फारच कमी आहे. पण करोनाचा कुठलाही नवीन वेरियंट समोर आला नाहीत तर. लसीकरणामुळे नागरिकांमध्ये मजबूत प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचं सर्वेक्षणात दिसून आले आहे.

करोनाचा पुन्हा धुमाकूळ : ७५ विद्यार्थी करोना संक्रमित, ओडिशा चिंतेत

वेरियंट आणि तीव्रता

व्हायरसचा प्रसार मोजण्यासाठी शास्त्रज्ञ R0 हा शब्द वापरतात. व्हायरसचा संसर्ग झालेल्या नागरिकांपासून सरासरी किती नागरिकांना संसर्ग होतो, असा याचा अर्थ आहे. करोनाच्या डेल्टा प्रकाराच्या बाबतीत आर नॉट ६ ते ७ च्या श्रेणीत होते. म्हणजे सरासरी ६ ते ७ नागरिकांना एका संक्रमित व्यक्तीकडून हा संसर्ग झाला.

डेल्टा प्रकाराने सिंगापूर आणि चीन सारख्या देशांना प्रभावित केले आहे. तिथे लसीकरणाचे दर खूप जास्त आहेत. पण कठोर लॉकडाऊन सारखे निर्बंध असल्याने नैसर्गिक प्रतिकारशक्ती (संसर्गामुळे उद्भवणारी प्रतिकारशक्ती) कमी होती. रशियामध्ये लसीकरण कव्हरेज अजूनही कमी आहे. डेल्टा वेरियंटने अलिकडच्या काही महिन्यांत तिथे कहर केला आहे.

ब्रिटनला देखील डेल्टा प्रकाराचा फटका बसला आहे. करोना व्हायरसमुळे पुढील २ ते ५ वर्षे श्वसनाच्या आजारांमुळे सरासरीपेक्षा जास्त मृत्यू होऊ शकतात, असा इशारा इम्पीरियल कॉलेज लंडनचे एपिडेमियोलॉजिस्ट नील फर्ग्युसन यांनी दिला आहे.

यंदाच्या हिवाळ्यात अमेरिकेत करोनाची हलकी लाट दिसू शकते. २०२२-२३ मध्ये, करोना एंडेमिक स्टेजवर पोहोचू शकतो, असा अंदाज अमेरिकेतील फ्रेड हचिन्सन कॅन्सर सेंटरमधील व्हायरस शास्त्रज्ञ ट्रेवर बेडफोर्ड यांनी वर्तवला आहे.

व्हायरसवरील फास घट्ट करणे

आतापासून २०२२ च्या अखेरीपर्यंत आपण या व्हायरसवर नियंत्रण आणू शकतो. तोपर्यंत आपण संसर्ग नियंत्रित करू शकू. आणि संसर्ग गंभीर होणे आणि मृत्यूची प्रकरणे लक्षणीयरीत्या कमी करू शकू, असे WHO कोविड-19 प्रतिसादाचे नेतृत्व करणाऱ्या एपिडेमियोलॉजिस्ट मारिया व्हॅन किरखोव्ह यांनी या महिन्यात सांगितले. मात्र, जगात करोनाचा एकही रुग्ण नाही, अशा स्थितीपर्यंत पोहोचणे अजून खूप लांब आहे. व्हायरसचा झपाट्याने होणारा प्रसार, स्वतःत बदल करण्याची क्षमता आणि त्याच्याशी संबंधित अनिश्चितता यामुळे हे कार्य अधिक आव्हानात्मक होत आहे.

सध्या शक्य तितक्या नागरिकांचे लसीकरण करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. यामुळे सरकारला करोनाचा सामना करण्यासाठी दीर्घकालीन रणनीती आखण्यासाठी वेळ मिळेल. खासकरून एंडेमिकट टप्प्यासाठी रणनीती आखण्यास वेळ मिळू शकेल, असे तज्ज्ञांच्या मत आहे.

लसीकरणाबरोबरच संसर्गविरोधी औषधांद्वारे उपचारही प्रभावी ठरत आहेत. आवश्यक असल्यास लसीचे बूस्टर डोस द्यावे. करोना हे आता आपल्या दैनंदिन जीवनाचे वास्तव आहे असे गृहीत धरून कोविड योग्य वर्तनाची सवय करणे आवश्यक आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: