Shreyas Iyer: पहिल्याच कसोटीत संकटमोचक ठरला श्रेयस अय्यर आणि केला हा विक्रम


कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर पहिली कसोटी आज गुरुवारपासून सुरू झाली. या सामन्यात भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिली विकेट लवकर पडल्यानंतर शुभमन गिल आणि चेतश्वर पुजार यांनी डाव थोडा सावरला. पण भारताची अवस्था ४ बाद १४५ अशी बिकट झाली होती. या परिस्थितीतून संघाला बाहेर काढण्याचे काम केले ते पदार्पण करणाऱ्या मुंबईच्या श्रेयस अय्यरने होय.

वाचा- कोण आहे मोहक कुमार? १२५ चेंडूत ३० षटकार आणि २८ चौकारांसह केल्या इतक्या धावा

वाचा- भारत-न्यूझीलंड सामन्यात ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा; जाणून घ्या

नाणफेक जिंकून फलंदाजी करण्याचा चांगला निर्णय अजिंक्यने घेतला असला तरी भारताला चांगली सुरूवात करता आली नाही. सलामीवीर मयांक अग्रवाल फक्त १३ धावांवर बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि पुजार यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. ही जोडी मोठी धावसंख्या करेल असे वाटत असताना गिल अर्धशतकानंतर बाद झाला. त्यानंतर संघाचे शतक पूर्ण झाल्यावर पुजारा देखील २६ धावांवर माघारी परतला. तर कर्णधार अजिंक्य रहाणे सेट होतोय असे वाटत असताना ३५ धावांवर बाद झाला. यामुळे भारताची अवस्था ४ बाद १४५ अशी झाली होती. भारताच्या चार पैकी ३ विकेट कायले जेमिन्सनने घेतल्या होत्या.

वाचा- भारतीय क्रिकेटपटूला ISIS कश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी; २४ तासात दुसऱ्यांदा दिला..

रहाणे बाद झाल्यानंतर रविंद्र जडेजा फलंदाजीला आला त्याच्या सोबत होता पहिली कसोटी खेळणारा श्रेयस अय्यर होय. भारताच्या डावाची सर्व मदार या दोघांवर होती. पहिली कसोटी खेळणाऱ्या श्रेयसने चाहत्यांना आणि भारतीय संघ व्यवस्थापनाला निराश केले नाही. पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावण्याचा विक्रम त्याने केला. याच बरोबर संकटात असताना संघाला बाहेर काढले. अय्यरच्या अर्धशतकामुळे भारताने २०० धावांचा टप्पा पार केला. त्याने जडेजा सोबत अर्धशतकी भागिदारी करून टीम इंडियाला समाधानकारक स्थितीत पोहोचवले.

सामना सुरू होण्याआधी भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी श्रेयसला कसोटीची कॅप दिली. भारतीय क्रिकेटच्या दिग्गजांकडून नवीन खेळाडूंना ही प्रतिष्ठित कॅप देण्याची जुनी परंपरा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पुन्हा सुरू केली आहे. याआधी टी-२० मालिकेदरम्यानही द्रविडने हर्षल पटेलकडे राष्ट्रीय संघाची कॅप सोपवण्यासाठी मर्यादीत षटकाच्या क्रिकेटमधील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या अजित आगरकरला बोलावले होते.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: