Sharad Pawar criticizes govt: ‘कितीही चौकशा लावा, आम्ही घाबरत नाही’; शरद पवार केंद्र सरकारवर गरजले


हायलाइट्स:

  • शरद पवार यांची केंद्र सरकार आणि भाजपवर टीकास्त्र.
  • ईडी, सीबीआयचा वापर करणे हा सत्तेचा दुरुपयोग- शरद पवार.
  • कितीही चौकशा लावा, आम्ही घाबरत नाही- शरद पवार.

सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा भाजप आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपचे सरकार नसलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकार ईडी, सीबीआय अशा विविध केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून चौकशा लावण्याचे प्रकार करतं. हा सत्तेचा दुरुपयोग असून त्याद्वारे स्थानिक सरकारचा उपमर्द करण्याचं काम ते नेहमीच करत आहेत. पण, त्यांना किती चौकशा लावायच्या आहेत त्या लावू देत, अशा चौकशांना आम्ही घाबरत नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी केंद्र सरकावर टीकास्त्र सोडलं आहे. (ncp leader sharad pawar criticizes union govt and bjp over ed cbi inquiries)

पवार महाबळेश्वर येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकालावरही भाष्य केलं. हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल. तसेच पुढील निवडणुकीत सर्व जर एकत्र लढले, तर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचेच सरकार येईल, असे पवार यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर; घेणार उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेट

महाविकास आघाडीचे हे सरकार दोन दिवसात पडेल. नंतर ते दोन महिन्यात पडेल, तर नंतर हे सरकार एक वर्षात पडेल असे भविष्य अनेकजण वर्तवत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील हे देखील असे भविष्य वर्तवत असतात, असे सांगतानाच ते जर ज्योतिष पाहण्याच्या क्षेत्रात गेले तर चांगले होईल, असा टोला पवार यांनी पाटील यांना लगावला आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘कामावर रुजू व्हा, अन्यथा…’; परिवहन मंत्री परब यांचा एसटी कर्मचाऱ्यांना ‘हा’ इशारा

राजकारणात संधी हिसकावून घ्यावी लागते, ती मिळत नसते असे सांगतानाच युवकांना निवडणुकीत संधी मिळायला हवी आणि अशी त्यांची अपेक्षा असणेही सहाजिकच आहे, असे पवार म्हणाले. आगामी निवडणुका एकत्रित लढायचे का याबाबत आजच्या शिबिरात चर्चा करण्यात आल्याचंही पवार यांनी सांगितले. तसेच या संदर्भात नियोजन करण्यात आले असून स्थानिक निवडणुकांमध्ये युवकांना संधी मिळावी याबाबतही चर्चा झाली,असे पवार म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- पगारवाढीनंतरही एसटी संप मागे घेण्याची घोषणा नाही, संपाबाबत उद्या घेणार निर्णय!Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: