Mamata Banerjee in Delhi: ‘सोनियांची भेट संविधानानुसार अनिवार्य नाही’, ममता डाफरल्या


हायलाइट्स:

  • ‘केवळ पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी वेळ मागितली होती’
  • सोनिया गांधींच्या भेटीबाबतच्या प्रश्नावर ममतांचा पारा चढला
  • ३० नोव्हेंबर रोजी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

नवी दिल्ली : दिल्ली दौऱ्यावर असलेल्या तृणमूल काँग्रेस अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदीसहीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचीही भेट घेणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, सोनिया गांधी आणि ममतांची ही भेट टळलीय. उल्लेखनीय म्हणजे, या भेटीसंबंधी ममतांना मीडियानं प्रश्न विचारला असता ‘सोनियांची भेट घटनात्मकदृष्ट्या अनिवार्य नाही… प्रत्येक वेळेस सोनियांना का भेटायचं?’ असा उलट प्रश्न ममतांनी पत्रकारांना विचारला.

‘आम्ही प्रत्येक वेळेस का भेट घ्यायची?’

तृणमूल काँग्रेसच्या याच विस्तारवादाची परिणीती म्हणून तब्बल तीन दिवस दिल्लीत असूनही ममता बॅनर्जी यांची भेट सोनिया गांधींशी होऊ शकली नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सोनियांशी भेटीसंबंधी प्रश्नावर उत्तर देतानं ममता बॅनर्जी यांनी, सर्व नेते पंजाब निवडणुकीत व्यग्र असल्यानं अशी कोणतीही योजना नसल्याचं म्हटलं. नंतर मात्र, ‘आम्ही प्रत्येक वेळेस भेट का घ्यावी? सोनियांची भेट संविधानानुसार अनिवार्य नाही’ असं म्हणताना ममतांचा सूर बदलला होता.

यावेळी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी वेळ मागितली होती, अशी पुश्तीही ममतांनी जोडली.

UP Elections: उत्तर प्रदेश निवडणुकीआधीच सोनिया गांधींच्या बालेकिल्ल्याला हादरा
Parliament Session: मोदी सरकारला घेरण्यासाठी व्यूहरचना, सोनियांच्या घरी पक्षनेत्यांची बैठक
सोनिया – ममता संबंध दुरावले?

उल्लेखनीय म्हणजे, एकेकाळी युथ काँग्रेसच्या महासचिव राहिलेल्या ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी यांचे संबंध एकेकाळी अधिक चांगले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचे संबंध दुरावलेले दिसत आहेत.

‘तृणमूल’कडून काँग्रेसला जोरदार झटके

गेल्या मंगळवारी काँग्रेसचे नेते कीर्ति आझाद आणि हरयाणातील ‘टीम राहुल’चे सदस्य राहिलेले अशोक तंवर आपला पक्ष सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झालेत.

बुधवारी रात्रीही मेघालयातही काँग्रेस विरुद्ध तृणमूल काँग्रेस असा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मेघालयाच्या माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्यासहीत १७ पैंकी १२ आमदार काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाले.

गेल्या काही दिवसांत काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सुपुत्र अभिजीत मुखर्जी, सिलचरचे काँग्रेसचे माजी खासदार आणि दिवंगत काँग्रेस नेते संतोष मोहन यांची मुलगी सुष्मिता देव यांचाही समावेश आहे.

Uttar Pradesh: यूपीत बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा खंडीत, तणावाचं वातावरण
himachal pradesh bjp : भाजपमध्ये हुकूमशाही सुरू आहे… म्हणत हिमाचल प्रदेश उपाध्यक्षांचा राजीनामा

तृणमूलची आक्रमक विस्तारवादी भूमिका

याशिवाय गोव्यात भाजपसहीत काँग्रेससमोरही तृणमूल काँग्रेस आव्हान म्हणून उभं राहिलंय. आपला राजकीय दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसी आणि महाराष्ट्रातल्या मुंबईपर्यंत विस्तारण्याची इच्छा ममतांनी व्यक्त केलीय.

येत्या ३० नोव्हेंबर रोजी ममता बॅनर्जी महाराष्ट्र दौऱ्यावर दाखल होणार आहेत. या दौऱ्यात त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वसर्वा शरद पवार यांची भेट घेतील.

धक्कादायक! गौतम गंभीर यांना मिळालेला धमकीचा ई-मेल पाकिस्तानातून
‘कृषी कायद्यांवरील अहवाल प्रसिद्ध करा’, समिती सदस्याची मागणीSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: