पीएफ खातेदारांसाठी महत्वाची बातमी; ई-नॉमिनेशन करणे झाले बंधनकारक, वाचा सविस्तर


हायलाइट्स:

  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कर्मचाऱ्यांसाठी आता ई-नॉमिनेशन अनिवार्य करण्यात आले आहे.
  • यामुळे आता विमा आणि पेन्शनचा लाभ घेणाऱ्या लोकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
  • पीएफ खातेदारांनी नामांकन अर्ज न भरल्यामुळे त्यांना विमा किंवा पेन्शनचा लाभ मिळण्यात अडचणी येतात.

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कर्मचाऱ्यांसाठी आता ई-नॉमिनेशन अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे आता विमा आणि पेन्शनचा लाभ घेणाऱ्या लोकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. पीएफ खातेदारांनी नामांकन अर्ज न भरल्यामुळे त्यांना विमा किंवा पेन्शनचा लाभ मिळण्यात अडचणी येतात. खातेधारकाचा मृत्यू झाल्यास, कुटुंबातील सदस्यांना कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येतात. त्यामुळे या सर्व समस्या सोडवण्यासाठी भविष्य निर्वाह निधीचा हा निर्णय फायदेशीर ठरणारा आहे.

या सहकारी बँंकेची आर्थिक स्थिती खालावली ; रिझर्व्ह बँंकेनं सहा महिन्यांसाठी घातले निर्बंध
पीएफ खातेदारांनी ई-नॉमिनेशन भरल्यास विमा, निवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ खातेधारकांना उपलब्ध होईल. माहिती देताना पीएफ आयुक्त ब्रिजेश कुमार म्हणाले की, खातेधारकांनी ई-नॉमिनेशन केल्यास त्यांना एनओसी घेण्याची गरज भासणार नाही. जर कर्मचारी विवाहित असेल, तर त्याच्या पत्नीचे आधार-मतदार कार्ड, फोटोसह ई-नामांकन दाखल करावे लागेल. या अंतर्गत आता कोणतीही विवाहित व्यक्ती या सुविधेअंतर्गत नॉमिनीचे नाव सहज नोंदवू शकते.

मुकेश अंबानींना झटका ! गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
ई-नामांकन भरा पुढीलप्रमाणे –
– सर्वात आधी ईपीएफओ (EPFO) पोर्टलमधील सेवा विभागात, कर्मचार्‍यांसाठी (फॉर एम्प्लॉइज) वर क्लिक करा. त्यानंतर यूएएन (UAN) किंवा ऑनलाइन सेवा वर क्लिक करा.
– सदस्य पोर्टल (मेंबर पोर्टल) जनरेट होत नसल्यास, आधी सदस्य पोर्टल तयार करा आणि लॉगिन करा.
– तुमचा फोटो आणि इतर माहिती अपडेट करण्यासाठी प्रोफाइलवर क्लिक करा.
– आता सदस्य पोर्टलवर, मॅनेजवर ई-नामांकन निवडा आणि फॅमिली डिक्लेरेशनवर होय किंवा नाही वर क्लिक करा.
– कुटुंबाचा तपशील (अॅड फॅमिली डिटेल्स) वर क्लिक करा आणि इतर तपशील आणि फोटोसह संबंधितांचा आधार क्रमांक जोडा.
– आता संपूर्ण कुटुंबाचे तपशील अपडेट केल्यानंतर सेव्ह फॅमिली डिटेल्स (Save Family Details)वर क्लिक करा.
– आता सेव्ह ई-नॉमिनेशन वर क्लिक करा आणि सदस्याचा आधार क्रमांक टाकून यूआयडीएआय (UIDAI) वेबसाइटवरून व्हर्च्युअल आयडी तयार करा, ज्याचा एक एसएमएस मिळेल.
– त्यानंतर पुढील सदस्य पोर्टलवर ई-साइन वर क्लिक करा आणि आधारवरून व्हर्च्युअल आयडी टाकून जनरेट ओटीपी वर क्लिक करा.
– आधारशी लिंक केलेल्या मोबाईलवर सहा अंकी ओटीपी (OTP) येईल, दिलेल्या जागेत ओटीपी टाका आणि सबमिट करा.
– अशाप्रकारे तुमचे ई-नामांकन यशस्वीपणे सबमिशन केल्यावर पूर्ण होईल.

वाचा : स्टार हेल्थ इन्शुरन्सचा IPO; राकेश झुनझुनवाला यांना होणार बंपर फायदा, केलीय मोठी गुंतवणूकSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: