IND vs NZ Kanpur: भारत-न्यूझीलंड सामन्यात ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा; जाणून घ्या कारण…


कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सत्रात भारताने १ बाद ८२ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने सलामीवीर शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजार या दोन महत्त्वाच्या विकेट गमावल्या.

वाचा- कोण आहे मोहक कुमार? १२५ चेंडूत ३० षटकार आणि २८ चौकारांसह केल्या इतक्या धावा

सामना सुरू झाल्यानंतर कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. सीमेवर पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना दिल्या जाणाऱ्या पाठिंब्यामुळे दोन्ही देशातील संबंध बिघडले आहेत. त्याचा परिणाम क्रिकेट मैदानावर पाहायला मिळाला.

वाचा- मुंबईच्या या स्फोटक फलंदाजाचे कसोटीत पदार्पण; पाहा अंतिम ११ मध्ये कोणाला स्थान मिळाले

गेल्या काही दिवसात पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत. यावर क्रिकेट चाहत्यांनी नाराजी दाखवली आणि सामना सुरू झाल्यानंतर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. भारतीय डावाची सुरूवात झाल्यानंतर सहाव्या षटकात शुभमन गिल आणि मयांक अग्रवाल हे फलंदाजी करत होते तर न्यूझीलंडकडून काईल जेमिन्सन गोलंदाजी करत होता. तेव्हा चाहत्यांनी जोर जोराद घोषणा देण्यास सुरूवात केली. नुकत्याच झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाला होता.

वाचा- भारतीय क्रिकेटपटूला ISIS कश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी; २४ तासात दुसऱ्यांदा दिला…

या सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि दुखापतीमुळे केएल राहुल यांच्या शिवाय टीम इंडिया मैदानात उतरत आहे. त्यामुळे अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे या खेळाडूंना चमकदार कामगिरी करून दाखवण्याची संधी आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: