Indian Railway: रेल्वेकडून करोनाकाळातील नियम मागे, प्लॅटफॉर्म तिकीट दरांत घट


हायलाइट्स:

  • देशात करोना परिस्थिती नियंत्रणात
  • रेल्वेकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी पुन्हा नियमांत बदल
  • प्लॅटफॉर्म तिकीटांचे दर कमी केले

नवी दिल्ली : देशात करोनाच्या संकटावर बऱ्यापैंकी नियंत्रण मिळाल्याचं चित्रं दिसून येतंय. दररोज दाखल होणाऱ्या करोना संक्रमणबाधितांच्या संख्येतही घट झालीय. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेनं करोनाकाळात लागू केलेल्या नियमांतही आता अनेक बदल करण्यात आले आहे. आता, रेल्वे प्रशासनाकडून नागरिकांना ‘प्लॅटफॉर्म दरांच्या’ बाबतीत आणखीन एक खुशखबर देण्यात आलीय. (Indian Railway | Platform Ticket)

भारतीय रेल्वेकडून आपल्या ‘प्लॅटफॉर्म तिकीट’ दरांत पुन्हा एकदा बदल करत हे दर कमी करण्यात आले आहेत. या निर्णयाची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी दिलीय.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल यांसहीत अनेक रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट दरात घट करण्यात आलीय. आता प्लॅटफॉर्म तिकीटासाठी नागरिकांना ५० रुपयांऐवजी केवळ १० रुपये मोजावे लागणार आहेत.

करोना काळात प्लॅटफॉर्म तिकीट दरांत वाढ करत रेल्वेकडून अनेक स्थानकांवर या तिकीटाचे दर ५० रुपये करण्यात आले होते.

Amazon: ‘अमेझॉन’द्वारे गांजा, विषारी पदार्थांची अवैध विक्री; ‘कॅट’कडून कारवाईची मागणी
Uttar Pradesh: यूपीत बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा खंडीत, तणावाचं वातावरण
याशिवाय, करोना लसीच्या दोन मात्रा पूर्ण करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना रेल्वेकडून विशेष सुविधा देण्यात येणार आहेत. करोना लसीच्या दोन्ही मात्रा घेणारे मध्य रेल्वेचे प्रवासी यापुढे मुंबई लोकल ट्रेनचं तिकीट अनारक्षित तिकीट प्रणाली (यूटीएस) अॅपद्वारे आपल्या मोबाईल फोनवर सिंगल तिकीट आणि महिन्याचा पास काढू शकणार आहेत.

यूटीएस अॅप अँन्ड्रॉईड फोनवर अगोदरपासूनच उपलब्ध होते. आज रात्रीपासून अॅप आयओएस फोनवरदेखील उपलब्ध होणार आहे. या सुविधेचा वापर उद्यापासून शक्य होणार आहे.

अॅपद्वारे ऑनलाईन तिकीट बुक करण्याच्या या सुविधेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे तसं रेल्वे तिकीट काऊंटरवर दिसून येणारी गर्दीही कमी होण्यास मदत होईल.

UP Elections: उत्तर प्रदेश निवडणुकीआधीच सोनिया गांधींच्या बालेकिल्ल्याला हादरा
Parliament Session: मोदी सरकारला घेरण्यासाठी व्यूहरचना, सोनियांच्या घरी पक्षनेत्यांची बैठकSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: