क्रिप्टोकरन्सीचा फुगा लवकरच फुटेल; माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा इशारा म्हणाले…


हायलाइट्स:

  • क्रिप्टोकरन्सीबाबत माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी इशारा दिला आहे.
  • चिट फंडामुळे देशात जशी समस्या निर्माण झाली होती, तशीच आता क्रिप्टोकरन्सीमुळे निर्माण होईल, असे राजन यांनी म्हटलं आहे.
  • क्रिप्टोकरन्सीला भारत आणि चीनसारख्या देशांचा विरोध आहे.

नवी दिल्ली : चिट फंडांसारख्या क्रिप्टोकरन्सीचा फुगा लवकरच फुटेल आणि त्यातील बहुतेकांचे अस्तित्व संपुष्टात येईल, असा दावा भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केला आहे. सीएनबीसी – टीव्ही १८ (CNBC-TV18) या बिझनेस चॅनलशी बोलताना राजन म्हणाले की, सध्या जगात सुमारे ६००० क्रिप्टोकरन्सी आहेत आणि त्यापैकी फक्त एक किंवा दोनच राहतील. बहुतेक क्रिप्टो अस्तित्वात आहेत, कारण लोकांना त्याबद्दल जास्त माहिती नाही. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चिट फंडामुळे देशात जशी समस्या निर्माण झाली होती, तशीच आता क्रिप्टोकरन्सीमुळे निर्माण होईल. चिट फंड लोकांकडून पैसे घेतात आणि नंतर गायब होतात. क्रिप्टो मालमत्ता बाळगणाऱ्या अनेकांना येत्या काही दिवसांत अशाप्रकारचा त्रास होण्याची शक्यता आहे.

मुकेश अंबानींना झटका ! गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
रघुराम राजन यांचा इशारा
राजन म्हणाले की, बहुतेक क्रिप्टो असे आहेत, त्यांची निश्चित किंमत नसते. ब्लॉकचेन तंत्रज्ञान राखण्याबाबत राजन म्हणाले की, केंद्र सरकारने ते देशात पुढे नेण्याची परवानगी दिली पाहिजे. सरकारने म्हटले आहे की, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाला परवानगी दिली जाऊ शकते.

स्टार हेल्थ इन्शुरन्सचा IPO; राकेश झुनझुनवाला यांना होणार बंपर फायदा, केलीय मोठी गुंतवणूक
आरबीआय लवकरच आणणार स्वतःचे डिजिटल चलन
भारतीय केंद्रीय बँक सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) ही देशाच्या फियाट चलनाची (जसे की रुपया, डॉलर किंवा युरो) डिजिटल आवृत्ती आहे. हे केंद्रीय बँकेद्वारे जारी केले जाते. तसेच त्याची हमीदेखील दिली जाईल. याचा व्यवहार कोणत्याही मध्यस्थाशिवाय किंवा बँकेशिवाय केला जातो.

बंदीच्या भीतीने ट्रेडर्स धास्तावले; चौफेर विक्रीने बिटकॉइनसह क्रिप्टो करन्सी कोसळले
क्रिप्टोकरन्सीला भारत आणि चीनसारख्या देशांचा विरोध आहे. तर अमेरिकेसह अनेक देश त्यासाठी अनुकूल योजना बनवत आहेत. मध्य अमेरिकेच्या एल. साल्वाडोर काँग्रेसने ८ जून २०२१ रोजी बिटकॉइन कायदा संमत केला आणि बिटकॉइनला कायदेशीर निविदा बनवणारा हा छोटा देश जगातील पहिला देश बनला.

दोन बँंकांचे खासगीकरण ; कर्मचारी संघटना आक्रमक, संसदेबाहेर आंदोलनाचा दिला इशारा
सध्या भारतात क्रिप्टोकरन्सीबाबत कोणतेही नियम नाहीत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिप्टोकरन्सीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि ठोस पावले उचलण्याचे संकेत दिले. क्रिप्टोकरन्सीबाबत नियमन नसल्यामुळे, त्याचा वापर टेरर फंडिंग आणि काळ्या पैशाच्या हेराफेरीसाठी केला जात आहे, असा सरकारचा विश्वास आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: