शक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरण: आरोपींची फाशीची शिक्षा रद्द; कोर्टाचा मोठा निर्णय


हायलाइट्स:

  • शक्तीमिल सामुहिक बलात्कार प्रकरण
  • तीन दोषींची फाशीची शिक्षा रद्द
  • कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली

मुंबईः संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी (Shakti Mills gang-rape case) आज मुंबई हायकोर्टाने मोठा निकाल दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तीन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केली असून तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

२०१३मधील या प्रकरणातील फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं होतं. शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या तिघांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती. त्यानुसार आज या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आज निर्णय देताना कोर्टाने तिघा आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केली असून शिक्षेचे जन्मठेपेत रुपांतर करण्याचा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती साधना जाधव व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

वाचाः एसटी संपाबाबत मोठी बातमी; आझाद मैदानातील आंदोलनातून पडळकर, खोत यांची तूर्तास माघार

फाशीच्या शिक्षेने पश्चात्तापाची संकल्पना संपुष्टात येते. या प्रकरणात दोषी हे फाशीच्याच शिक्षेसाठी पात्र आहेत, असे म्हणता येणार नाही. केलेल्या गुन्ह्याबद्दल आयुष्यभर पश्चात्ताप करण्यासाठी ते पात्र आहेत. त्यांच्या बाबतीत सुधारणेविषयी कोणताही वाव नाही आणि समाजात पुन्हा मिसळण्यासाठीही ते पात्र नाहीत. भारतीय दंड संहितेतील ३७६-ई या कलमान्वये बलात्काराच्या गुन्ह्याच्या प्रकरणात आधी दोषी ठरलेल्याने पुन्हा बलात्काराचा गुन्हा केल्यास त्याला फाशीची किंवा मरेपर्यंत जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. त्याअनुषंगाने दोषींना नैसर्गिकपणे मरण येईपर्यंत जन्मठेप सुनावण्यात येत आहे, असे न्यायमूर्ती साधना जाधव व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने निर्णयात स्पष्ट केले आहे.

वाचाः
Big Breaking: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल

काय आहे प्रकरण?

मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये २२ ऑगस्ट २०१३ ला एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. छायाचित्रकार असणारी महिला आपल्या सहकाऱ्यासोबत फोटाग्राफी करण्यासाठी गेली होती. यावेळी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला होता.

वाचाः
परमबीर सिंह यांनी कसाबचा मोबाईल लपवला होता; निवृत्त एसपींच्या आरोपाने खळबळSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: