धक्कादायक! गौतम गंभीर यांना मिळालेला धमकीचा ई-मेल पाकिस्तानातून


हायलाइट्स:

  • भाजप खासदार गौतम गंभीर यांना धमकीचा ई मेल
  • गौतम गंभीर यांना आलेल्या धमकीच्या मेलची पाळंमुळं पाकिस्तानात
  • तपासणीत धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली : माजी क्रिकेटर आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीर यांना मिळालेल्या धमकीच्या मेलची पाळंमुळं पाकिस्तानात असल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासणीतून समोर आलाय. या मेलमध्ये गौतम गंभीर आणि त्यांच्या कुटुंबांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. (ISIS Kashmir Threat To Gautam Gambhir)

हा धमकीचा मेल पाकिस्तानातून धाडला गेल्याचा खुलासा झालाय. दिल्ली पोलिसांनी ‘गूगल’कडे या मेलसंबंधी माहिती मागितली होती. गूगलनं दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीर यांना मिळालेला धमकीचा ई मेल पाकिस्तानातून धाडण्यात आला आहे. हा मेल ज्या सिस्टममधून धाडम्यात आला त्याचा आयपी अॅड्रेस पाकिस्तानात आढळला आहे.

Gautam Gambhir: ‘इसिस काश्मीर’कडून गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी, सुरक्षेत वाढ
Amazon: ‘अमेझॉन’द्वारे गांजा, विषारी पदार्थांची अवैध विक्री; ‘कॅट’कडून कारवाईची मागणी
भाजपचे पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे खासदार गौतम गंभीर यांना मंगळवारी एक धमकीचा मेल मिळाला होता. ‘इसिस काश्मीर‘कडून गंभीर आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी या ई-मेलद्वारे देण्यात आली होती. हा मेल मिळाल्यानंतर गौतम गंभीर यांनी तातडीनं बुधवारी रात्री मध्य दिल्ली पोलीस उपायुक्त श्वेता चौहान यांची भेट घेऊन आपली तक्रार नोंदविली होती. त्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला होता. सोबतच, पोलिसांनी गंभीर यांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ केली आहे.

दरम्यान गौतम गंभीर यांच्यासोबतच अनेक प्रसिद्ध व्यक्तींना दहशतवादी संघटना ‘इसिस’च्या नावे धमकीचे ई मेल धाडण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणावर दिल्ली पोलिसांचं लक्ष असून ते याबाबतीत अधिक तपास करत आहेत. दिल्ली पोलिसांशिवाय इतर सुरक्षा यंत्रणाही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.

Indian Railway: रेल्वेकडून करोनाकाळातील नियम मागे, प्लॅटफॉर्म तिकीट दरांत घट
Uttar Pradesh: यूपीत बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा खंडीत, तणावाचं वातावरणSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: