मुकेश अंबानींना झटका ! गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती


हायलाइट्स:

  • सौदी अरामकोसोबतचा कंपनीचा करार रद्द झाल्यापासून रिलायन्सचे शेअर्स दबावात आहेत.
  • अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी रिकव्हरी दिसून आली आहे.
  • मार्केट कॅपनुसार गौतम अदानी समूह भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

मुंबई : मार्केट कॅपनुसार गौतम अदानी समूह भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी रिकव्हरी दिसून आली आहे. तर सौदी अरामकोसोबतचा कंपनीचा करार रद्द झाल्यापासून रिलायन्सचे शेअर्स दबावात आहेत. तज्ज्ञांच्या मते, रिलायन्स एक मजबूत कंपनी आहे, पण अदानी समूहाने विकसित केलेली पायाभूत सुविधा हे त्यांचे बाजार भांडवल वाढवण्याचे मुख्य कारण आहे.

स्टार हेल्थ इन्शुरन्सचा IPO; राकेश झुनझुनवाला यांना होणार बंपर फायदा, केलीय मोठी गुंतवणूक
बाजार तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदार अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स कमी कालावधीत २०-२५ टक्क्यांनी वाढू शकतात, त्यामुळे या शेअर्समध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. गेल्या १८ महिन्यांत या शेअर्सची वाटचाल खूप चांगली राहिली आहे. जून-जुलै २०२१ पासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे, पण अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये मोठी रिकव्हरी दिसून आली आहे.

या सहकारी बँंकेची आर्थिक स्थिती खालावली ; रिझर्व्ह बँंकेनं सहा महिन्यांसाठी घातले निर्बंध
अदानी ग्रीन आणि अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये रिकव्हरी
अदानी ग्रीन आणि अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्येही रिकव्हरी झाली आहे. अदानी एंटरप्रायझेस हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय दिसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तर अदानी पोर्ट्स गुंतवणूकदारांसाठी अधिक चांगला पर्याय आहे, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बंदीच्या भीतीने ट्रेडर्स धास्तावले; चौफेर विक्रीने बिटकॉइनसह क्रिप्टो करन्सी कोसळले
रिलायन्सच्या शेअर्सवर दबाव
दुसरीकडे, सौदी अरामकोसोबतचा करार मोडल्यानंतर रिलायन्सच्या शेअर्सवर दबाव वाढला आहे. रिलायन्सचा शेअर मध्य सत्रापर्यंत चांगली कामगिरी करत होता, पण शेवटच्या काही तासात तो झपाट्याने घसरला, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मंगळवारच्या (२३ नोव्हेंबर) बाजाराच्या बंदवर नजर टाकली, तर गौतम अदानी यांचा समूह ८८.८ अब्ज डॉलरवर होता. तर रिलायन्स ९१ अब्ज डॉलरवर होती. अदानी समूहाच्या अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेस या शेअर्सच्या वाढीमुळे गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकले आहे.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: