भारतीय क्रिकेटपटूला ISIS कश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी; २४ तासात दुसऱ्यांदा दिला…


नवी दिल्ली: भारताचा माजी सलामीवीर आणि सध्या भाजपचा पूर्व दिल्लीचा लोकसभेचा खासदार गौतम गंभीर याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गंभीर आणि त्याच्या कुटुंबीयांना गेल्या २४ तासात दुसऱ्यांचा अशी धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. गंभीरने याची माहिती दिल्ली पोलिसांना कळवली आहे.

वाचा- कोण आहे मोहक कुमार? १२५ चेंडूत ३० षटकार आणि २८ चौकारांसह केल्या इतक्या धावा

गंभीरने आरोप केला आहे की ISISच्या कश्मीर मॉड्यूलने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दिल्ली पोलिसमधील डीसीपी श्वेता चौहान यांनी सांगितले की या प्रकरणी आम्ही चौकशी करत आहोत. दरम्यान गंभीर यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ISISच्या कश्मीर मॉड्यूलकडून ही धमकी ई-मेलद्वारे दिली जात आहे. गंभीरला हा ई-मेल मंगळवारी रात्री ९ वाजता मिळाला. या मेलमध्ये गंभीरसह त्याच्या कुटुंबियांना धमकी देण्यात आली आहे. मंगळवारी आलेल्या ई-मेलनंतर बुधवारी संध्याकाळी देखील पुन्हा एकदा ई-मेलवरून अशीच धमकी देण्यात आली.

वाचा- मुंबईच्या या स्फोटक फलंदाजाचे कसोटीत पदार्पण; पाहा अंतिम ११ मध्ये कोणाला स्थान मिळाले

गंभीरला आलेल्या ई-मेलवर ISIS कश्मीर असे म्हटले आहे. काल तुला मारणार होते, पण तु वाचलास; काश्मीरपासून दूर रहा. या मेल सोबत गौतम गंभीरच्या घरा बाहेरचा व्हिडिओ देखील पाठवला आहे. सुरक्षा दलाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे आणि सायबर सेलने याची चौकशी सुरू केली आहे. भारताच्या या माजी क्रिकेटपटूला धमकी मिळण्याची ही पहिली वेळे नाही.याआधी डिसेंबर २०१९ साली गंभीर आणि कुटुंबीयांना अशाच प्रकारची धमकी देण्यात आली होती. तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोनवरून धमकी देण्यात आली होती. तेव्हा देखील गंभीरने पोलिसांकडे तक्रार दिली होती.

वाचा- IND vs NZ Preview: कानपूर कसोटीत या कारणामुळे भारताचा विजय पक्का; १९८३ पासून…

गौतम गंभीर नेहमी त्याच्या बेधडक वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतो. नुकत्याच झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर त्याने विराट कोहलीवर जोरदार टीका केली होती. विराट मानसिकरित्या मजबूत नसल्याचे त्यांने म्हटले होते.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: