‘अमेझॉन’द्वारे गांजा, विषारी पदार्थांची अवैध विक्री; ‘कॅट’कडून कारवाईची मागणी


हायलाइट्स:

  • अमेझॉनच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा अवैध कारवायांसाठी वापर
  • परदेशी ‘अमेझॉन’मुळे छोट्या व्यापाऱ्यांचं नुकसान
  • देशभरातील व्यापाऱ्यांचा विरोध प्रदर्शन

नवी दिल्ली : अमेरिकेची दिग्गज कंपनी ‘अमेझॉन‘ भारतात वादात अडकलीय. अमेझॉनच्या ई कॉमर्स पोर्टलवरून अवैध पद्धतीनं गांजा, बॉम्ब बनवण्याची साधनसामग्री तसंच देशात बंदी घातलेली काही रसायनं ग्राहकांना सहज उपलब्ध होत असल्याचं समोर आल्यानंतर देशात ‘अमेझॉन’च्या विरोधाला धार मिळालीय.

‘कॅट’च्या माध्यमातून व्यापारी एकवटले

‘अमेझॉन’च्या या मनमानी पद्धतीच्या कारभाराला तीव्र विरोध करतानाच ‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’नं (CAIT) नं परदेशी कंपनीला जोरदार विरोध दर्शवला आहे.

बुधवारी देशातील वेगवेगळ्या राज्यात ५०० हून अधिक जिल्ह्यांत १२०० हून अधिक शहरांत धरणं आंदोलन करत विरोध प्रदर्शन केलं.

अमेझॉननं देशातील कायदे आणि नियमांनुसार, आपलं व्यवसाय मॉडल राबवावं अन्यथा भारतातून आपला गाशा गुंडाळावा, असा इशाराच ‘कॅट’नं ई-कॉमर्सला वेबसाईटला दिलाय. देशात सामान्यांसाठी आणि मोठ्या कंपन्यांसाठी वेगवेगळे कायदे आहेत का? असा सवालही व्यापाऱ्यांनी उपस्थित केलाय.

ई कॉमर्स व्यवसायांत कायदे आणि नियमांचं उल्लंघन सहन केलं जाणार नाही. या प्रकरणात ठोस कारवाई करण्यात आली नाही तर देशातील व्यापारी ‘भारत व्यापार बंद’ करतील, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिलाय.

प्रेमासाठी वाट्टेल ते! व्हिजाशिवाय बांगलादेशातून महिला भारतात, दीड वर्षांनी सत्य समोर
Uttar Pradesh: यूपीत बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा खंडीत, तणावाचं वातावरण
‘अमेझॉन’वरून गांजा विक्री

गांजा विक्रीप्रती अमेझॉनच्या प्रेमाचं उदाहरण म्हणजे, या ई कॉमर्स वेबसाईटकडून अमेरिकन सरकारला गांजा विक्री वैध करण्यासाठी विनंती करण्यात आलीय, असा आरोपही व्यापाऱ्यांनी ई-कॉमर्स वेबसाईटवर केलाय. अमेझॉन आणि इतर ई कॉमर्स कंपन्यांच्या बिझनेस मॉडेलची चौकशी आणि समीक्षा नित्यनियमानं केली जावी, अशी मागणीही व्यापाऱ्यांनी केलीय.

‘अमेझॉन’वर आर्यन खान प्रमाणे कारवाई

भारतात अमेझॉन पोर्टलच्या माध्यमातून गांजा विक्रीचा प्रकारही समोर आल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय. ड्रग्ज प्रकरणात ज्या पद्धतीनं अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली, त्याच पद्धतीनं अमेझॉनवरही कारवाई केली जायला हवी, असंही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

‘देशद्रोहा’चा गुन्हा दाखल करावा

२०१९ साली झालेल्या पुलवामा हल्ल्यांत वापरल्या गेलेल्या रसायनांच्या सहज विक्रीसाठी ‘अमेझॉन’ विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणीही ‘कॅट’नं केलीय. या प्रकरणी दोषी व्यक्तींना कायद्यानुसार दंड दिला जावा. प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत अमेझॉन पोर्टल बंद ठेवण्यात यावं, अशी मागणीही व्यापाऱ्यांनी केलीय. या प्रकरणात देशात बंदी असलेल्या रसायनांची खरेदी अमेझॉनच्या माध्यमातून करण्यात आल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणात अद्याप अमेझॉनच्या अधिकाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही.

विषारी पदार्थांची अवैध ऑनलाईन विक्री

‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया आणि महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इंदूर शहरात एका व्यक्तीनं ‘अमेझॉन’ विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. तीन महिन्यांपूर्वी आपल्या मुलानं ‘अमेझॉन’द्वारे विषारी पदार्थ मागवले, ई-कॉमर्स वेबसाईटवरून त्याला ते तत्काळ उपलब्धही झाले. याच विषारी पदार्थांचं सेवन करून मुलानं आत्महत्या केल्याचं पित्याचं म्हणणं आहे. या प्रकरणात ई कॉमर्स वेबसाईट अमेझॉन विरुद्ध कारवाई करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलीय.

UP Elections: उत्तर प्रदेश निवडणुकीआधीच सोनिया गांधींच्या बालेकिल्ल्याला हादरा
Parliament Session: मोदी सरकारला घेरण्यासाठी व्यूहरचना, सोनियांच्या घरी पक्षनेत्यांची बैठकSource link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: