या सहकारी बँंकेची आर्थिक स्थिती खालावली ; रिझर्व्ह बँंकेनं सहा महिन्यांसाठी घातले निर्बंध


हायलाइट्स:

  • रिझर्व्ह बँकेने राज्यातील एका अर्बन सहकारी बँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहे.
  • मलकापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहेत.
  • गेल्याच आठवड्यात रिझर्व्ह बँकेने सोलापूरमधील लक्ष्मी सहकारी बँक लिमिटेड या बँकेवर निर्बंध घातले होते.

मुंबई : बँकांच्या आर्थिक स्थितीवर बारीक लक्ष ठेवून असलेल्या रिझर्व्ह बँकेने राज्यातील एका अर्बन सहकारी बँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहे. मलकापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहेत. बँकेच्या ग्राहकांना यापुढे खात्यातून १० हजार रुपये काढण्याची मर्यादा घालण्यात आली आहे.

स्टार हेल्थ इन्शुरन्सचा IPO; राकेश झुनझुनवाला यांना होणार बंपर फायदा, केलीय मोठी गुंतवणूक
मागील काही महिने मलकापूर अर्बन बँकेची आर्थिक स्थिती खालावत असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनात आले होते. त्यानुसार आरबीआयकडून ही कारवाई करण्यात आली. आरबीआयने बुधवारी २४ नोव्हेंबर २०२१ च्या मध्यरात्रीपासून मलकापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लागू केले आहेत. पुढील सहा महिने हे निर्बंध राहतील, असे आरबीआयने म्हटलं आहे.

बंदीच्या भीतीने ट्रेडर्स धास्तावले; चौफेर विक्रीने बिटकॉइनसह क्रिप्टो करन्सी कोसळले
रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय मलकापूर अर्बन बँकेला नव्याने कर्ज वितरण, ठेवी स्वीकारणे आणि नूतनीकरण करता येणार नाही. मात्र बँकेला नेहमीप्रमाणे व्यवहार करता येतील, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. ग्राहकांना सर्व खात्यातून १० हजारांपर्यंत रक्कम काढता येईल, असे आरबीआयने म्हटलं आहे.

दोन बँंकांचे खासगीकरण ; कर्मचारी संघटना आक्रमक, संसदेबाहेर आंदोलनाचा दिला इशारा
गेल्याच आठवड्यात रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी सहकारी बँक लि. सोलापूर या बँकेवर निर्बंध घातले होते. बँकेची ढासळलेली आर्थिक स्थिती पाहता केंद्रीय बँकेने हे पाऊल उचलले होते. बँकेच्या ग्राहकांना आता त्यांच्या खात्यातून फक्त एक हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली होती.Source link

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
%d bloggers like this: